कोल्हापूर : तीन अल्पवयीन मुलींना मद्य पाजून अत्याचार करणाऱ्या दोघा तरुणांना पाच वर्षांची सक्तमुजरी आणि साडेआठ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) ही शिक्षा सुनावली.हर्षल आनंदा देसाई (वय २४, रा. इस्लामपूर, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (२४, रा. पवार मळा, गांधीनगर, ता. करवीर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. खटल्यात सरकारी वकील म्हणून अमिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
दरम्यान, याच गुन्ह्यातील एका अल्पवयीन संशयिताविरुध्दचा खटला बाल हक्क न्यायालयात सुरू आहे. इस्लामपूर येथील शिवनगर येथील एका कॉलनीतील इमारतीच्या फ्लॅटमध्ये २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर २०१८ हा प्रकार घडला होता. हर्षल आणि प्रमोद यांनी महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या तीन अल्पवयीन मुलींना त्या फ्लॅटवर नेले.तेथे त्यांना मद्य पाजून अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी मुलींच्या अंगावरील दागिने काढून घेतले.
ते कोल्हापुरातील सराफाकडे विकून त्यांनी त्या पैशातून दारू, सिगारेट, गांजा, चिकन खरेदी केले. दुसऱ्या दिवशीही दोघांनी त्या मुलींनादरम्यान, तिन्ही मुली दोन दिवस घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस अधिकारी स्मिता पाटील यांना मुलींचे मोबाईल लोकेशन इस्लामपूर असल्याचे आढळले. पोलिसांचे पथक तेथे गेल्यावर दोन्ही आरोपी आणि मुली फ्लॅटमध्ये आढळल्या होत्या. पोलिस उप अधीक्षक सुरज गुरव आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांनी या प्रकरणाचा तपास केला.