ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या पारड्यात टॉसचा निकाल लागला नाही. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने टॉस जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिला सामना टीम इंडियाने 2 धावांनी जिंकला होता. डवकर्थ लुईस नियमांनुसार (DLS) हा निकाल देण्यात आला होता. त्यानंतर आता भारतीय संघाकडे या सामन्यात (IND vs IRE 2nd T20I) विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. दुसरीकडे आयर्लंडला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्वाचा असेल.
पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि गेम फिरवला होता. आयर्लंडला प्रत्युत्तर देताना भारताने 6.5 ओव्हरमध्ये 47 धावा उभ्या केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने 2 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. त्यामुळे आता तीन सामन्याची मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला फक्त एका विजयाची गरज आहे.
आजच्या सामन्यात बुमराहने कोणतेही बदल केले नाहीत. आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. आज हवामान थोडे चांगले आहे आणि आम्हाला बोर्डवर धावा काढायच्या होत्या, असं बुमराहने म्हटलं आहे. माझं शरीर फीट आहे, सुरुवातीला थोडी काळजी घेतली आणि नंतर आत्मविश्वास वाढवत राहिलो आणि ते चांगले झालं, असंही बुमराह म्हणाला आहे.
पाहा Playing XI:
आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (C), लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (WK), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (C), रवी बिश्नोई.