Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगगणेशोत्सव शांततेत पार पाडा; लेसर,डॉल्बीला परवानगी नाही

गणेशोत्सव शांततेत पार पाडा; लेसर,डॉल्बीला परवानगी नाही

ताजी बातमी ऑनलाईन टीम

उचगावातील गणेश उत्सव सर्व नियमांचे पालन करून शांततेत पार पाडावा त्याचबरोबर डॉल्बी सह लेसरशो ला कोणतीही परवानगी मिळणार नाही , मिरवणूक बारा पर्यंतच संपवावी असे आवाहन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी व्यक्त केलं. ते उचगाव येथे मंगेश्वर मंदिरात आयोजित गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत बोलत होते.

करवीर तालुक्यातील उचगाव येथील मंगेश्वर मंदिरामध्ये सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष ,कार्यकर्ते, आणि लोकप्रतिनिधीची गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने बैठक आयोजित केली होती. यावेळी गणेश उत्सवा संदर्भात माहिती देताना गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील म्हणाले की यंदा लेझर शो आणि डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकी ही चार वाजता सुरू होऊन रात्री बारापर्यंत शिस्तबद्ध संपवण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.

यावेळी लोकप्रतिनिधीसह विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उचगाव गावची लोकसंख्या ४५ हजारच्या आसपास असून या ठिकाणी सुमारे ७० सार्वजनिक मंडळाच्या बरोबरच घरगुती गणेश उत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशीच मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन मिरवणूक ही एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळे विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे विसर्जनासाठी मध्यरात्री दोन पर्यंत ची वेळ वाढवून द्यावी, तसेच ध्वनी मर्यादा पाळून दोन टॉप दोन बेस लावण्यासाठी परवानगी द्यावी, मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी टोकन पद्धतीचा अवलंब करावा, यासह अनेक मागण्या यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या.

यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगुले, दीपक रेडेकर, सुरज पाटील, अजित पाटील, करण यादव, अमर पाटील, गणेश भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी उपसरपंच विराग करी, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, रमेश वाईंगडे,अरविंद शिंदे, राहुल मोळे, विनायक हावळ, फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष वसंत मोरे, गुरुदेव माने, पोलीस पाटील स्वप्निल साठे,दत्ता यादव,विजय गुळवे,यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -