इचलकरंजी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी योजना कार्यान्वित करणे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. सुळकूड योजनेसंदर्भात बैठक लावावी यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर केले होते.
यातून मार्ग काढत अमृत २.० अभियानांतर्गत सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंजूरी दिली. परंतु या योजनेला कागल आणि शिरोळ तालुक्यातील दुधगंगा काठावरील ग्रामस्थांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कागल आणि इचलकरंजीतील लोकप्रतिनिधींची बाजू ऐकून घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्य शासनाला अहवाल पाठविला आहे. या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी या प्रश्नी चर्चेतून समन्वयाने मार्ग काढूया असे आवाहन करत शासन दरबारी पाठपुरावा करुन योजना कार्यान्वि करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली होती.
त्यानुसार खासदार माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुळकूड संदर्भात तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या दालनात मुख्यमंत्री दालनात बैठक सुळकूड योजना संदर्भात बैठक आयोजित केली आहे.
दरम्यान, सुळकूड योजनेसंदर्भातील बैठकीचे पत्र खास. धैर्यशील माने यांनी सुळकूड योजना अंमलबजावणी समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्याकडे सुपूर्द केले. या बैठकीकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून राहीले आहे. दरम्यान, बुधवार ता. २३ रोजी इचलकरंजी दिलेली बंदची हाक व प्रांत कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.