Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगगणेशमूर्तीच्या दरात यंदा वाढ होणारप्लॅस्टर - रंगांच्या दरवाढीचा परिणाम

गणेशमूर्तीच्या दरात यंदा वाढ होणारप्लॅस्टर – रंगांच्या दरवाढीचा परिणाम

कोल्हापूरचा पूर, पनवेलच्या खाडीत भिजल्याने खराब झालेल्या गणेशमूती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बंदीची अनिश्चितता यामुळे यंदा जिल्ह्यातील गणेशमूर्तीच्या दरात वाढ होणार आहे. प्लॅस्टरबाबत ठोस निर्णय होत नसल्याने जिल्ह्यात बहुतांशी नागरिकांसह कारागिरांनी शाडूच्या मूर्तीत पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा घरगूती शाडूच्या मूर्ती वाढल्या आहेत. यंदा प्लॅस्टरच्या दरात २० टक्क्यांच्या वाढीसह रंग व कारागिरांचा पगार अशा सगळ्यांचा परिणाम गणेशमूर्तीच्या किंमतीवर होणार आहे. किमान ४० टक्क्यांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यात तब्बल एक हजार कारागिरांनी घरगुती गणेशच्या दीड लाखांहून अधिक मूर्ती केल्या आहेत. त्यात ४० टक्के गणेशमूर्ती शाडूच्या आहेत. शाडूच्या मूर्ती वापरण्याचे प्रमाण मागील वर्षापेक्षा तब्बल ३० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे इको फ्रेंडली
गणेशोत्सव अनुभवास मिळणार आहे. जिल्ह्यात एक लाख ७५ हजारावर घरगुती गणेशाच्या मूर्ती केल्या जातात. दीड, पाच, सात, नऊ व अनंत चतुर्दशीला वेगवेगळ्या मूर्ती विसर्जित होतात.
मागील वर्षापेक्षा यंदा तब्बल ३० टक्क्यांनी शाडूच्या गणेशमूर्तीत वाढ झाली आहे.

तब्बल ४० टक्के गणेशमूर्ती शाडूच्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मध्यंतरी पूर आला. त्यावेळी त्या पुरात अनेक मूर्ती भिजून नुकसान झाले. परिणामी यंदा मूर्ती कमी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पनवेललाही तीच स्थिती आहे. तेथील खाडीला आलेल्या पुरामध्ये मूर्ती भिजल्याने तेथून येणाऱ्या मूर्ती कमी झाल्या आहेत. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी मागणी वाढूनही मूर्तीची कमतरता भासण्याची भीती आहे. सरकारने प्लॅस्टरला शेवटच्या टप्प्यात परवानगी दिली. त्यामुळे कमी कालावधीत मूर्ती तयार करणे शक्य नाही. त्याचाही परिणाम मूर्ती तयार करणाऱ्यांसह विक्रीवरही होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -