Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : ..तरच ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये होईल विवाहाची नोंद; पंचायतीचा महत्वपूर्ण ठराव

Kolhapur : ..तरच ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये होईल विवाहाची नोंद; पंचायतीचा महत्वपूर्ण ठराव

गगनबावडा तालुक्यातील निवडे ग्रामपंचायतीने नवविवाहित दाम्पत्यांना विवाह नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रांसोबत आपल्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची दोन झाडे लागवड करून त्यासोबतचे छायाचित्र ग्रामपंचायतीस देणे बंधनकारक केले आहे.सदरचे छायाचित्र सादर केल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला ग्रामपंचायतकडून मिळणार आहे. निवडे येथे हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा फक्त फलकापुरत्याच उरल्या आहेत. मात्र, नववधू-वरांनी आधी वृक्ष लागवड करून त्यासोबतचे छायाचित्र सादर करावे, मगच विवाह नोंद करून प्रमाणपत्र दिले जाईल.

गावातील ज्या व्यक्तीची जमीन कमी असेल किंवा घर मर्यादित असेल अशा ग्रामस्थांनी देखील दोन वृक्ष लागवड करायची आहे. ज्या शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात जमीन असेल असे शेतकरी दोन पेक्षा जास्त वृक्ष लागवड करू शकतात. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबरच पडिक जमीन लागवडीखाली व अन्य पिकाखाली येऊ शकणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून नागरी आणि ग्रामीण क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणारा अनोखा एकात्मिक असा उपक्रम माझी वसुंधरा अभियान ४.० व कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. या वेळी सरपंच सरिता दीपक पाटील, उपसरपंच मेघा प्रकाश कांबळे, ग्रामसेवक प्रसाद झोरे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -