Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनAishwarya Rai हिने दान केलेत स्वतःचे सुंदर डोळे; कोणाला मिळणार नवी दृष्टी?

Aishwarya Rai हिने दान केलेत स्वतःचे सुंदर डोळे; कोणाला मिळणार नवी दृष्टी?

अभिनेत्री ऐश्वर्या राय जगातील सर्वात सुंदर महिला आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. आजही ऐश्वर्या हिच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेते उत्सुक असतात. ऐश्वर्या राय हिचं सौंदर्य, तिच्या डोळ्यांच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करते. इंडस्ट्रीमधील प्रत्येक जण ऐश्वर्या हिच्या डोळ्यांचं कौतुक करत असतो. ऐश्वर्या फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही तर, तिच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पण ऐश्वर्या हिने स्वतःचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर, ऐश्वर्या राय नेत्रदान मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. अभिनेत्री कायम लोकांना या कार्यासाठी प्रेरित करत असते.

सांगायचं झालं तर, ऐश्वर्या राय हिने स्वतःचे सुंदर डोळे ‘आय बँक एसोसिएशन ऑफ इंडिया’ (Eye Bank Association Of India) ला दान केले आहेत. म्हणजे, ऐश्वर्या राय हिचं निधन झाल्यानंतर तिचे डोळे एखाद्या गरजू व्यक्तीला मिळू शकतात. अभिनेत्रीच्या निधनानंतर ऐश्वर्या राय हिच्या डोळ्यामुळे कोणा गरजू व्यक्तीला नवी दृष्टी मिळणार आहे.

नेत्रदानाबद्दल अभिनेत्री म्हणते, जर तिचे डोळे कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकत असतील तर यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. त्यामुळेच ऐश्वर्याने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.. असं ऐश्वर्याचं म्हणणं आहे. ऐश्वर्या कायम तिच्या डोळ्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

फक्त ऐश्वर्या राय बच्चन नाही तर, अभिनेता सलमान खान, आमिर खान, ऋतिक रोशन, महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी देखील अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलिब्रिटी कायम त्यांच्या मोठ्या निर्णयामुळे चर्चेत असतात. सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगत आहे.

ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अव्वल स्थानी आहे. ऐश्वर्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे..


सोशल मीडियावर देखील ऐश्वर्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऐश्वर्या देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ऐश्वर्या कायम पती अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन यांच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. स्वतःचे देखील फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -