ज्या समाजात आपण राहतो, वागतो, घडलो अशा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून काही व्यक्ती, संस्था सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. असेच एक समाजाला आदर्श घडवून देणारे काम योगेश चौगुले फाउंडेशन व शिव कन्या महिला ग्रुपच्या वतीने नुकताच करण्यात आले.
यामध्ये नुकताच समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप योगेश चौगुले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश चौगुले व शिवकन्या महिला ग्रुपच्या सीमा वाघ यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी सीमा वाघ, प्रियंका रायण्णावर, अनिता शिंदे, भारती बोने, मनिषा निकम, माया पराळ, अशा वाकरे, दिपाली घाडगे, मीरा दिवाने, दिपाली मस्के या मान्यवरांसह परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
दरम्यान गोरगरीब समाजातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा प्रकारची मदत करण्याची आवाहन शिवकन्या महिला ग्रुपच्या अध्यक्ष श्रीमती सीमा वाघ यांनी केले आहे. त्याचबरोबर ज्या कोणाला मदत करायची असेल त्यांनी 9096601655 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असेही म्हटले आहे.
योगेश चौगुले फाउंडेशन व शिवकन्या महिला ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -