Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीलोकसभा लढवणार?, मंत्री हसन मुश्रीफांनी टाकली गुगली; म्हणाले..

लोकसभा लढवणार?, मंत्री हसन मुश्रीफांनी टाकली गुगली; म्हणाले..

कोल्हापूर : लोकसभेला उभारणार का अशी विचारणा केल्यानंतर अहो, अजून दोन टर्म आमदार व्हायचेय अशी गुगली वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी टाकली. ही दिलखुलास प्रतिक्रिया देताना ‘अजून मला तालुक्यातील जनतेची सेवा करायचीय’ हे सांगायलाही विसरले नाहीत.

शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना प्रश्नोत्तरे झाली. तेव्हा दिल्लीत खासदार निलंबनाविरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू असल्याबाबत मुश्रीफ यांना विचारण्यात आले. तेव्हा मी खासदार नसल्याने मला दिल्लीचे काही माहिती नाही असे मुश्रीफ म्हणाले. तेव्हा पत्रकारांनी तुम्हांला खासदार व्हायचेय काय असे विचारल्यावर मुश्रीफ म्हणाले, अहो, अजून दोन टर्म मी आमदार होणार आहे. तालुक्यातील जनतेची सेवा मला करायची आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -