Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगबाई पण भारी! एसटीने फिरा, एमटीडीसी रिसॉर्टवर राहा, सरकारचं महिलांना मोठं गिप्ट

बाई पण भारी! एसटीने फिरा, एमटीडीसी रिसॉर्टवर राहा, सरकारचं महिलांना मोठं गिप्ट

 

एसटी महामंडळाच्या प्रवासासाठी तिकीटात 50 टक्के सूट द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, यानंतर आता एमटीडीसीच् या रिसॉर्ट्समध्येही महिलांना 50 टक्के सूट मिळणार आहे. पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 या कालावधीमध्ये एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना 50 टक्के सवलत मिळवणार आहे.

एमटीडीसीचे एकूण 34 पर्यटन निवास, 27 उपहारगृह, निवास आणि न्याहरी, महाभ्रमण, कलाग्राम, इको टुरिजम असे उपक्रम आहेत. याशिवाय एमटीडीसीची बीच रिसॉर्ट, हिल रिसॉर्ट, जंगल रिसॉर्ट, बोट क्लब, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.

काय आहेत नियम?

या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे.

ही सवलत 01 ते 08 मार्च या कालावधीसाठी वैध असेल. ही सवलत, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. सवलतीमध्ये नाश्त्याचा समावेश नाही. या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही. ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतीं सोबत जोडली जाऊ शकत नाही. एकावेळी केवळएकाच सवलतीचा लाभ घेता येईल.

ही सवलत एमटीडीसीच्या लिज प्रॉपर्टीजसाठी (आंबोली, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर) केलेल्या बुकिंगसाठी आणि इतर कोणत्याही ओटीए (OTA) प्लॅटफॉर्मवरून केलेल्या बुकिंगसाठी वैध नाही. पर्यटकांना डिस्काऊंट प्रोमो कोडचा वापर फक्त एकाच वेळी करता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी केलेल्या बुकिंगवर प्रोमो कोड लागू होणार नाही. या अटी व शर्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचनेशिवाय बदलण्याचा अधिकार एमटीडीसीने राखून ठेवले आहे. हा प्रोमो कोड वापरून एकावेळी फक्त एका कक्षाचे बुकिंग करता येईल. ज्यांच्या नावावर बुकिंग केले जाईल त्या व्यक्तीने चेक-इनच्या वेळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अन्यथा, बुकिंगची पूर्ण रक्कम जमा करावी लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -