Sunday, November 3, 2024
Homeब्रेकिंगआता 500 च्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो? RBI कडून नवीन नोट जारी?...

आता 500 च्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो? RBI कडून नवीन नोट जारी? सत्य काय

 

 

सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) फोटो (Photo) असलेली 500 रुपयांची नोट (Currency Note) खूप चर्चेत आहे. आरबीआय (RBI) 500 रुपयांची नवीन नोट जारी केल्याची सोशल मीडीयावर चर्चा आहे. अयोध्येत राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधी सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेला 500 रुपयांचा फोटो व्हायरल होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) ने 500 रुपयांची नवी नोट जारी केल्याचा दावा केला जात आहे. मेटाच्या मालकीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे. यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घ्या. आता 500 च्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो?

 

रामललाचा प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाली असून 22 जानेवारीला हा सोहळा संपन्न होईल. गुन्हेगार या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत. राम मंदिराच्या नावाखाली दररोज फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता प्रभू श्रीराम आणि राम मंदिराची फोटो असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. पण आरबीआयने खरोखरच राम मंदिराचा फोटो असलेली 500 रुपयांची नवीन नोट जारी केली आहेत का? जर तुम्हालाही अशी नोट मिळाली असेल तर यामागचं सत्य जाणून घ्या.

 

 

RBI कडून 500 रुपयाची नवीन नोट जारी?

 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नव्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महात्मा गांधींऐवजी भगवान श्रीरामाचा फोटो आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी सरकारने नवीन 500 रुपयांच्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढून त्याजागी भगवान श्रीरामाचे फोटो लावल्याचा दावा केला जात आहे.

 

 

व्हायरल नोट खरी की खोटी?

 

फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाइटने या प्रकरणी सत्य तपासण्याचा प्रयत्न केला असता महत्त्वाची बाब समोर आली आहे. प्रभू श्री रामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचा फोटो एडिट केलेला आणि बनावट असल्याचे फॅक्ट चेक आढळून आलं. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

 

 

व्हायरल नोटेमागचं सत्य काय?

 

आरबीआयच्या वेबसाईटवर माहितीनुसार, बँकेच्या नोटांमधील बदलांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्याच्या 2000 रुपयांची नवीन मालिकेतील 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -