कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या विटभट्टी वरुन बेपत्ता असणाऱ्या साडेचार वर्षाच्या मुलाचा मृतदेह कोथळी येथील कृष्णा (river) नदीपत्रात आढळून आलेने खळबळ असून घटनास्थळी आई वडिलांच्या आक्रोश हृदय पिळवटणारा होता.याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी कोथळी तालुका शिरोळ येथील नेमगोंडा पाटील यांच्या विटभट्टी वर काम करणाऱ्या मुदक्काप्पा शैल्य पतंगे यांचा साडेचार वर्षाचा मुलगा मल्लिकार्जुन शुक्रवार दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी दुपार पासून बेपत्ता होता.
या बेपत्ता मुलाचा मृतदेह शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास विटभट्टी जवळच असणाऱ्या कृष्णा नदी पत्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.सदर घटनेची माहिती समजताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप कोळेकर यांनी घटनास्थळी पहाणी करुन बेपत्ता असणाऱ्या साडेचार वर्षाच्या मल्लिकार्जुनचा मृतदेह (river) नदी पात्राच्या बाहेर काढण्यात आला रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात दिला.
यावेळी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली या घटनेची माहिती समजताच कोथळी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.सदर घटनेचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.