मुरबाडमधील एका 17 वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या(cosmopolitan drink) केल्याची घटना घडली आहे. मुरबाडमधील स्थानिक महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी मारून स्वत:चं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
या मुलाला त्याच्या सहा महाविद्यालयीन मित्रांनी मारहाण केली होती(cosmopolitan drink). नग्न अवस्थेत मारहाण करून त्याचा व्हिडिओ शूट केला होता. या प्रकारामुळे निराश होऊन या पीडित विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतला, अन् जीवन संपवलं. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांना अटक केली आहे, तर एक विद्यार्थी फरार आहे.
मुरबाडमधील खोपोली गावातील हा विद्यार्थी होता. त्याने या घटनेची माहिती देणारी चिठ्ठी लिहिली होती, ती सापडली आहे. त्यानंतर हे प्रकरण उघड झालं आहे. 21 फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थ्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर दिला होता. त्यानंतर ही घटना घडली होती. पीडित विद्यार्थी त्याच्या अभ्यासू स्वभावासाठी ओळखला जात होता. परंतु 21 फेब्रुवारीला तो त्याच्या कॉलेजच्या वरिष्ठांकडून रॅगिंगचा निशाणा बनला.
21 फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थी पेपर संपवून घरी परतत होता. त्यानंतर त्याच्या काही वरिष्ठ मित्रांनी त्याला थांबवलं. त्यांच्यासोबत जाण्यास भाग पाडलं होतं. ते त्याला मुरबाड येथील एका फार्महाऊसवर घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी दारू पिऊन या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. जबरदस्तीने त्यांच्यासोबत दारू पिण्यास भाग पाडलं.
पीडित विद्यार्थ्याने नकार दिल्यावर सर्वांनी त्याला जबरदस्तीने विवस्त्र केलं. त्याचा नग्न अवस्थेत व्हिडिओ काढला. त्यानंतर त्याला घरी पाठवलं. तो रात्री उशिरा घरी परत आला, पण त्याने त्याच्या कुटुंबाला काहीही सांगितले नाही. 23 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगा बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेत असताना त्याचा मृतदेह गावातील विहिरीत आढळून आला.
रविवारी रात्रीपर्यंत कुटुंबीयांना त्याचे कारण माहीत नव्हते. त्याच्या एका नातेवाईकाने त्याचा फोन सुरू केला. तेव्हा फोनमध्ये त्यांना या घटनेचा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडली होती. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि पॉक्सो कायद्याच्या तरतुदींखाली आयपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी या मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी, दिली आहे.