Homeमहाराष्ट्रकृष्णा नदीसह सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत उपसाबंदी; कोयनेतून चार हजार क्युसेक विसर्ग

कृष्णा नदीसह सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत उपसाबंदी; कोयनेतून चार हजार क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील शेती, औद्योगिक वापरासाठीच्या पाणीयोजनांवर रविवार (दि. २०) पासून उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. कृष्णा नदीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ही उपसाबंदी लागू राहील. पिण्याच्या पाणीयोजना मात्र सुरूच राहतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी दिली.

 

डिग्रज बंधाऱ्यापासून राजापूर धरणापर्यंत उपसाबंदी लागू असेल. जत तालुक्यातील सर्व २६ तलाव, कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा व शिराळा तालुक्यांतील सांगली पाटबंधारे विभागांतर्गत १७ तलाव, मोरणा नदी व त्यावरील बंधारे, कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी मध्यम प्रकल्प, बंडगरवाडी, बोरगाव, दुधेभावी, घोरपडी, हरोली, कुची, लांडगेवाडी, लंगरपेठ, नांगोळे, रायवाडी हे १० लघु प्रकल्प, मिरज तालुक्यातील भोसे मिरज लघु प्रकल्प, शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्प तसेच अंत्री, शिवणी, टाकवे व वाकुर्डे हे लघु प्रकल्प, वाळवा तालुक्यातील कार्वे व रेठरे धरण या लघु प्रकल्पांतून उपसा करता येणार नाही.

 

जत तालुक्यातील कोसारी, तिप्पेहळ्ळी, वाळेखिंडी, सिद्धनाथ, रेवनाळ, बिरनाळ, शेगाव, तिकोंडी, जालिहाळ, येळवी, सोरडी, प्रतापपूर, सनमडी, भिवर्गी, शेगाव क्रमांक २, दरिबडची, पांडोझरी, अंकलगी, मिरवाड, गुगवाड, डफळापूर, बिळूर, उमराणी, खोजनवाडी, बेळुंखी आणि दोड्डनाला या तलावांवर उपसाबंदी राहील.

 

या प्रकल्पांमधून शेती व औद्योगिक कारणासाठी पाणी उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व वीजपुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. उपसा संच जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

 

कोयनेतून चार हजार क्युसेक विसर्ग

 

दरम्यान, सांगलीसाठी सोमवारी (दि. २१) सकाळी ८ वाजता कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. दोन वक्र दरवाजे १ फुटाने उघडून २,९३३ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १,०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. नदीमध्ये एकूण ३,९८३ क्युसेक विसर्ग सुरू होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -