Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात २७ तोळे दागिन्यांसह ५० हजार रुपयांची धाडसी चोरी

कोल्हापुरात २७ तोळे दागिन्यांसह ५० हजार रुपयांची धाडसी चोरी

कोल्हापुरातील रायगड कॉलनी इथल्या कुलूपबंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलं. चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्यान घराची कुलूप आणि तिजोरी फोडून २७ तोळे वजनाचे सोन्या – चांदीचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये चोरून नेले. कोल्हापूरात धाडसी चोरी ची ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत संदीप फराकटे यांनी करवीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोल्हापुरातील रायगड कॉलनी इथं संदीप फराकटे हे पत्नी आणि मुलासह राहतात. त्यांचा कंट्रक्शनचा व्यवसाय आहे. पत्नी सोनाली या राहत्या घरी क्लासेस चालवतात. तर ९ वर्षाचा हर्षदीप हा मुलगा शालेय शिक्षण घेतो. २ दिवसांपूर्वी पती संदीप फराकटे हे कामानिमित्य बाहेरगावी गेले होते. घरी कोणीच नसल्याने आणि शनिवार, रविवार क्लासला सुट्टी असल्याने त्यांची पत्नी सोनाली या मुलासह शुक्रवारी दुपारी इचलकंजी इथल्या माहेरी गेल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -