Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरतीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा ( सहा लाखाचा मुद्देमाल जप्त )

तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा ( सहा लाखाचा मुद्देमाल जप्त )

ताजी बातमी ऑनलाइन टीम

मुरगूडमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकली असून त्यात ५ लाख ९२ हजार ६००रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .मुरगूडातील या मोठ्या धाडीमुळे एकच खळबळ माजली आहे.

मुरगूड पोलीसातून मिळालेली अधिक माहीती अशी निपाणी राधानगरी रोडवरील एका तीन पानी जुगार अड्ड्यावर रात्री धाड टाकली यात जुगार खेळताना १८ जणांना रंगेहाथ पकडले . त्यांच्याकडील रोख २७ हजार शंभर रूपये १ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे १८ मोबाईल हॅण्डसेट , २९ हजार ५००रुपये किंमतीचे तीन लाकडी टेबल, दहा लाकडी खुर्त्या व १५ प्लास्टीक खुर्ध्या तसेच ३ लाख
७० हजार रुपये किंमतीच्या १० मोटरसायकली व १५६ पत्यांची पाने असा ५ लाख ९२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या १८ जणांवर पोलीसांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये चंद्रकांत डवरी, जोतीराम पाटील,भिकाजी माने, आनंदा कल,अभिजित पाटील, साताप्पा दळेकर,धनाजी पाटील, केरबा कळमकर,अजित म्हेतर, धोंडीराम कांबळे,सुनिल पाटील, अनिकेत कांबळे, शिवाजी कुंभार, बबन देवेकर, कृष्णात पाटील ,युवराज शिंदे ,चंद्रकांत पाटील ,सुहास कांबळे आदिवर कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -