पाचगाव (ता. करवीर) येथील रायगड कॉलनीतील बांधकाम व्यावसायिक संदीप हरी फराकटे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी 27 तोळे दागिने, 50 हजारांची रोकड असा 11 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीला आला. मध्यवर्ती व गजबजलेल्या कॉलनीत ही घटना घडल्याने चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.