Sunday, December 22, 2024
Homeक्रीडासनरायझर्स हैदराबाद प्लेऑफसाठी एक विजय दूर, वाचा इतर संघांची काय स्थिती ते

सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफसाठी एक विजय दूर, वाचा इतर संघांची काय स्थिती ते

 

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 57 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सची अक्षरश: माती केली. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी दिलेलं 166 धावांचं आव्हान 9.4 षटकात पूर्ण केलं. यासह गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.

 

आयपीएल 2024 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. मात्र सनरायझर्स हैदराबादचा संघ यात सरस ठरला. नुसता सरस ठरला नाही तर लखनौ सुपर जायंट्सला दारूण पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय अंगलट आला असंच म्हणावं लागेल. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 4 गडी गमवून 165 धावा केल्या आणि विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सनरायझर्स हैदराबादने हे आव्हान 9.4 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केलं.लखनौ सुपर जायंट्सकडून आघाडीचे फलंदाज काही खास करू शकले नाहीत. क्विंटन डीकॉक आणि मार्कस स्टोइनिस एकेरी धावांवर बाद झाले. केएल राहुलने 29, कृणाल पांड्याने 24 धावा केल्या. तर निकोलस पूरन नाबाद 48 आणि आयुष बदोनी नाबाद 55 धावांवर होते. तर सनरायझर्सकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडच भारी पडले. या दोघानी विजयी भागीदारी केली. अभिषेक शर्माने नाबाद 75 आणि ट्रेव्हिस हेडने नाबाद 89 धावा केल्या. यासह सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

 

सनरायझर्स हैदराबाद आता प्लेऑफमध्ये एक विजय दूर आहे.उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी प्लेऑफमधील आपलं स्थान तसं पक्क केलं आहे. मात्र अधिकृतरित्या अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही. कोलकाता नाईट रायडर्स 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कोलकात्याचा नेट रनरेट हा +1.453 इतका आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर असून 16 गुण आणि नेट रनरेट हा +0.476 इतका आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ तिसऱ्या स्थानी असून 14 गुण आणि +0.406 नेट रनरेट आहे.

 

चेन्नई सुपर किंग्स 12 गुण आणि +0.700 नेट रनरेटसह चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स 12 गुण आणि -0.316 नेट रनरेटसह पाचव्या, लखनौ सुपर जायंट्स 12 गुण आणि -0.769 नेट रनरेटसह सहाव्या, आरसीबी 8 गुण आणि -0.049 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 8 गुण आणि -0.212 नेट रनरेटसह नवव्या आणि गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.320 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -