ग्राहकांना अक्षय तृतीयेपूर्वीच दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारात सोने स्वस्त झाले. तर चांदीत नरमाई आली आहे. उद्या Akshaya Tritiya 2024 चा मुहूर्त आहे. त्याआधी मौल्यवान धातू स्वस्त झाल्याने सराफा बाजारात गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
Akshaya Tritiya 2024 चा उद्या मुहूर्त आहे. त्यापूर्वीच सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात दोन दिवसांमध्ये मौल्यवान धातूने किंमतीत चढाई केली. सोन्यासह चांदीने पण षटकार मारला. एप्रिल 17 पासून चांदीने मोठी घौडदौड केलेली नाही. पण दोन दिवसांत चांदी 2000 रुपयांनी महागली. पण त्यानंतर चांदी नरमली. तर सोने पण उतरले. आता या दोन दिवसांत मौल्यवान धातूच्या किंमती अजून उतरल्या तर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी उसळू शकते. या दिवशी केलेली खरेदी अक्षय राहत असल्याने अनेकजण या दिवशी खरेदीचा मुहूर्त साधतात. असा आहे सोने आणि चांदीच्या किंमती
सोने उतरले
गेल्या आठवड्यात सोने 400 रुपयांनी वधारले तर दोन हजारांनी स्वस्त झाले होते. या आठवड्यात 6 मे रोजी सोने 200 रुपयांनी वधारले. तर 7 मे रोजी 330 रुपयांनी किंमती वधारल्या. 8 मे रोजी दरवाढीला ब्रेक लागला. सोने 100 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी नरमली
17 एप्रिलपासून चांदीने फार मोठी झेप घेतली नाही. चांदीत नरमाईचे सत्र सुरु होते. या आठवड्यात चांदीने दोन हजारांची चढाई केली. सलग दोन दिवस चांदी महागली. 6 आणि 7 मे रोजी प्रत्येकी हजार रुपयांनी भाव वधारले. काल किंमतीत कोणतीच मोठी अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोने 71,645 रुपये, 23 कॅरेट 71,358 रुपये, 22 कॅरेट सोने 65,648 रुपये झाले. 18 कॅरेट 53,734 रुपये, 14 कॅरेट सोने 41,912 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,542 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.