Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाऑरेंज कॅपच्या शर्यतीत ट्रेव्हिस हेडची मोठी झेप, पाहा कोणत्या स्थानावर ते

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ट्रेव्हिस हेडची मोठी झेप, पाहा कोणत्या स्थानावर ते

 

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 57व्या सामन्यात ट्रेव्हिस हेड नावाचं वादळ घोंघावलं. सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडने लखनौच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. श्वास घ्यायला कुठेच उसंत दिली नाही. वादळी खेळी करत सामना 9.4 षटकात पूर्ण केला. यासह ट्रेव्हिस हेड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता पुढे आला आहे.

 

आयपीएल 2024 स्पर्धेत ऑरेंज कॅपची शर्यत गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी होत होती. विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर घेऊन फिरत आहे. मध्यंतरी एखाद दुसऱ्या सामन्यात हा मान ऋतुराज गायकवाडला मिळाला. मात्र त्यानंतर विराट कोहलीने कमबॅक करत पुन्हा एकदा हा मान मिळवला. ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांच्यात ऑरेंज कॅपसाठी फक्त एका धावेचं अंतर आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यानंतर हमखास हा मान ऋतुराज गायकवाडला मिळेल यात शंका नाही. मात्र शून्यावर बाद झाला तर हा मान विराट कोहलीकडेच राहिल. असं असताना या रेसमध्ये आता सनरायझर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडने एन्ट्री मारली. कारण विराट आणि हेडच्या धावांमधील अंतर आता फारसं राहिलेलं नाही. त्यामुळे येत्या काही सामन्यात ही लढाई आणखी चुरशीची होणार आहे. ट्रेव्हिस हेडने 30 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या आणि या रेसमध्ये उतरला आहे.

 

आरसीबीचा रनमशिन्स विराट कोहली 542 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या शर्यतीत 541 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ट्रेव्हिस हेडने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 89 धावांनी वादळी खेळी करून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या एकूण 533 धावा झाल्या आहेत. म्हणजेच ऑरेंज कॅपसाठी त्याला फक्त 9 धावा कमी पडल्या. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन या रेसमध्ये चौथ्या स्थानी आहे. त्याने 471 धावा केल्या आहेत. तर कोलकात्याचा सुनील नरीन या शर्यतीत पाचव्या स्थानी असून त्याने 461 धावा केल्या आहेत.

 

ऑरेंज कॅपची ही शर्यत येत्या काही दिवसात चुरशीची होणार यात शंका नाही. कारण आता साखळी फेरीत प्रत्येक संघाच्या दोन ते तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या शेवटच्या टप्प्यात ज्या फलंदाजाची बॅट चालेल तोच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरेल. विराट कोहलीचं दुर्देव म्हणजे त्याला फक्त तीन सामने मिळणार आहे. आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या तीन सामन्यात त्याने मोठी खेळी केली तर त्याचा हात कोणी पकडू शकणार नाही. त्यामुळे तीन सामन्यात विराट कोहली कशी खेळी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -