Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्यअत्यंत शांत असतात या जन्मतारखेचे लोक ; मनातील भावना ही सहजासहजी करत...

अत्यंत शांत असतात या जन्मतारखेचे लोक ; मनातील भावना ही सहजासहजी करत नाही व्यक्त, डोक्यात मात्र चालतो विचारांचा कल्लोळ 

अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत.

 

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.

 

अंकशास्त्रात काही मूलांकांच्या लोकांना फार भाग्यवान समजलं जातं, यामध्ये मूलांक 7 चाही समावेश आहे. मूलांक 7 चा शासक ग्रह गुरू आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुरुचा आशीर्वाद असतो. या मूलांकांचे लोक फार शांत असतात, मनातील भावना इतरांसमोर ते पटकन व्यक्त करत नाहीत. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

 

आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत

 

ज्योतिषशास्त्रात 7 क्रमांकाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. असं मानलं जातं की मूलांक 7 चे लोक रहस्यमय, अंतर्मुख आणि बुद्धिमान असतात. ते त्यांच्या मनातील गोष्टी सहजासहजी कोणाशी शेअर करत नाहीत आणि अनेकदा त्यांचे विचार आणि भावना लपवून ठेवतात. या लोकांना त्यांचं आयुष्य खाजगी ठेवणं आवडतं. त्यांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं गरजेचं वाटत नाही.

 

अंतर्मुख स्वभावाचे असतात हे लोक

 

7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात. या लोकांना एकटं राहणं आवडतं. या मूलांकाचे लोक बुद्धिमान आणि जिज्ञासू असतात आणि ते नेहमी ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असतात. हे लोक कोणतीही समस्या खोलवर समजून घेण्यास सक्षम असतात. या लोकांना अध्यात्मात विशेष रुची असते. हे लोक जीवनाचा सखोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

 

स्वतंत्र आणि स्वावलंबी असतात हे लोक

 

मूलांक 7 चे लोक स्वतंत्र असतात, त्यांना कुणाच्या ओझ्याखाली जगणं आवडत नाही. यासोबतच हे लोक स्वावलंबी असतात, कोणत्याही गोष्टीसाठी ते इतरांवर अवलंबून राहत नाहीत, इतरांवर अवलंबून राहणं त्यांना आवडत नाही.

 

हुशार आणि मेहनती असतात

 

मूलांक 7 च्या लोकांची कल्पनाशक्ती चांगली असते. हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. हे लोक लहानपणापासूनच अभ्यासात खूप तल्लख असतात. हे लोक अनेकदा परीक्षेत टॉप करतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोकआपल्या कुटुंबाला वैभव मिळवून देतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -