Wednesday, March 12, 2025
Homeराजकीय घडामोडीNDA मध्ये भूकंप होणार? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत!

NDA मध्ये भूकंप होणार? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत!

लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळाल्याने भाजपची संपूर्ण मदार ही एनडीएमधील घटक पक्षांवर आहे. भाजपने घटक पक्षांच्या मदतीने बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा एनडीए सरकार स्थापन झाले आहे.

 

सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आहेत. पण घटक पक्षांच्या टेकूवर उभे असलेले भाजपप्रणित एनडीए सरकारमध्ये राजकीय भूकंप होणार, असा दावा करण्यात आला आहे.

 

केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला एनडीएमधील घटक पक्ष टीडीपी आणि जेडीयू सारख्या पक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची कामगिरी चांगली झाली नाही तिथे पक्षाची चिंता वाढली आहे. तेथील खासदारांनी पक्ष बदलला तर… ही चिंता भाजपला सतावत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

काय आहे दावा?

 

साकेत गोखले हे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. ‘भाजपचे तीन खासदार लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील’, असा दावा साकेत गोखले यांनी केला आहे. ‘भाजपच्या तीन खासदारांनी पक्ष बदलला तर त्यांच्याकडे केवळ 237 खासदार राहतील. तर ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांची संख्या 237 वरून 240 होईल. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे हे अस्थिर सरकार फार काळ टिकणार नाही’, असा दावा साकेत गोखले यांनी केला आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे मोठे नुकसान

 

पश्चिम बंगालमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. त्यावेळी तृणमूल काँग्रेसने 22 जागा जिंकल्या होत्या तर, 16 जागा जिंकत भाजपने 18 वर उडी घेतली होती. या लोकसभा निवडणुकीत भाजपने 35 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले होते. पण भाजपला मोठा फटका बसला. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे 12 खासदार निवडून आले. तर तृणमूल काँग्रेसचे 29 खासदार निवडले गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -