Saturday, November 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत रविवारी सीएलईपी व संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

इचलकरंजीत रविवारी सीएलईपी व संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल यांचे वतीने आणि इचलकरंजी बार असोसिएशन तसेच जयसिंगपूर व कुरुंदवाड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने रविवार 16 जून रोजी इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे ‘कंटीन्युअर लीगल एज्युकेशन प्रोग्रॅम (सीएलईपी)’ आणि ‘संविधान अमृतमहोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांचे उपस्थितीत संपन्न होत असून इचलकरंजी येथील जिल्हा न्यायाधीश एम. आर. नेर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यानिमित्ताने ‘भारतीय संविधानातील लोकमंत्र’ या पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्तान ज्येष्ठ विधीज्ञ यांचा सन्मान महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल यांच्या वतीने इचलकरंजी येथील ज्येष्ठविधिज्ञ सुधाकर नरहर कुलकर्णी, आर. आर. तोष्णीवाल, संजय बी. खंजिरे, सौ. माधुरी श्रीकांत काजवे, अरुण गणपती बडवे आणि अशोक आर. जाधव आणि कुरुंदवाड येथील नामांकित ज्येष्ठ वकील मुकूंद वामन अर्जुनवाडकर, विजय शंकर सुतार, जयसिंगपूर येथील धनपाल आण्णा बेळंकी व चन्नाप्पा सिद्राम किल्लेदार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा बार कौन्सिल सदस्य विवेकानंद घाटगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

याप्रसंगी ऑल इंडिया बार कौन्सिल सदस्य आशिष देशमुख, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र उमाप, उपाध्यक्ष उदय वारुंजीकर व सदस्य जयंत जयभावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले, जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश गुरव यांच्यासह इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड येथील न्यायाधीश वृंद व वकील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात अ‍ॅड. डॉ. अरविंद आव्हाड, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. जयंत जयभावे व अ‍ॅड. गजानन चव्हाण या मान्यवरांचे विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन इचलकरंजी बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज चुडमुंगे, इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोशिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अमित सिंग, जयसिंगपूर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय पाटील, कुरुंदवाड बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शितल पाटील व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -