Sunday, September 8, 2024
Homeआरोग्यउतार वयात तंदुरुस्त राहण्यासाठी घरगुती उपाय

उतार वयात तंदुरुस्त राहण्यासाठी घरगुती उपाय

मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोक आपल्या शरीराकडे लक्ष देणे सोडून देतात आणि त्यामुळे भविष्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. आपल्या शरीर सुदृढ राहावे अशी प्रत्येकांच्या इच्छा असते. आपल्याला कोणताही प्रकारचा रोगाचा सामना करायला लागू नये असे प्रत्येकांनाच वाटत असते. त्यासाठी आपल्या शरीरासाठी योग्य तो वेळ देणे खूप गरजेचे आहेत. योग्य तो आहार घेणे देखील गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण काही अशा सूचना जाणून घेणार आहेत की ज्यामुळे आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.

जर तुमच्या पाया सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये पाय सोडून वीस मिनिटे बसावे. यामुळे पायाचे दुखणे कमी होते.
सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने मधुमेह, पोटाची चरबी यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते.
आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवल्याने आपल्या शरीराला त्याचा फायदा होत असतो.
त्वचा विषयाच्या काही समस्या असतील तर कढीपत्ता खाल्ल्याने ते कमी होण्यास मदत होते. कारण कढीपत्ता मध्ये अँटी फंगल गुणधर्म असतो.
गाजराचा रस आणि मध एकत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
रोज रात्री झोपण्याच्या आधी दोन वेलची खाल्ल्याने जडपणा कमी होतो व युरिन इन्फेक्शन ची समस्या कमी होते.
केसातील कोंडा कमी करायचा असेल तर आपला आहारामध्ये जास्तीत जास्त पालक भाजीचे सेवन करायला हवे.
रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिना यांचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
वजन कमी करायचं असल्यास तर दुधीच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
सर्दी खोकला कमी होत नसल्यास दुधामध्ये केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर आपल्या छातीवर व कपाळावर चोळावे.
हिवाळ्यामध्ये हिरव्या मिरचीचे सेवन करावे यामुळे रक्तप्रवाह जलद होतो.
चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरची क्षमता वाढते.
मुतखड्याचा त्रास असल्यास तो सकाळी पाण्या तून लिंबू पिळून द्यावे.
त्वचा तरुण रहावे यासाठी अश्वगंधाचे सेवन दररोज करावे.
रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते.
रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तींना कोणताही आजार होत नाही.
कडुलिंबाच्या पानाने आंघोळ केल्यास अनेक आजारांपासून सुटका मिळतो.
लघवी करताना जळजळ होत असेल तर सकाळी नाष्टा सोबत काकडी खावी. जळजळ संपूर्ण निघून जाते.
रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही कोणत्याही भागावर इन्फेक्शन होत नाही.
जेवण झालं कधीही झोपू नये कारण त्यामुळे आपल्या अन्नाचे अपचन होते. जेवण झाल्यावर रोज शतपावली करावी ज्यामुळे अन्नाचे पचन होते.
चेहऱ्यावर काळे डाग असतील तर लिंबाचा रस लावावा.
खोकला जात नसेल तर दुधामध्ये बत्ताशे मिसळून प्यावे खोकल्यावर आराम मिळतो.
तेलकट पदार्थामुळे शरीरामध्ये चरबी वाढण्याची शक्यता असते.
शरीर दुखत असेल तर मखाण्यामध्ये मिसळलेले दूध खावेत. त्यामुळे शरीरात कॅल्शियम चे प्रमाण वाढते व अंगदुखी कमी येते.
जर तुमचे वजन जास्त वाढत असला तर रोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस किंवा दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते.
रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी व एक लवंग खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोट दुखी यांसारखे सर्व समस्या दूर होते.
तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज काजळ लावावे.
रोज बीट सेवन केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते, वजन कमी होते व शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते.
रोज दुधाचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर वेगळी चमक येते व शरीरातील हाडे मजबूत होतात.
जे लोक नियमित केळी खातात त्यांचे वजन वाढते त्यामुळे केळीचे सेवन योग्य प्रमाणात करावे.
कडुलिंबाचा रस रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा पिल्याने शरीरातील सर्व रोग दूर होतात.
तुमची चेहऱ्याची त्वचा कोरडी असेल तर चेहऱ्यावर गुलाब जल लावावे.
भोपळ्यांच्या बियांचे सेवन केल्याने केस गळती कमी होते व केस लांब होतात.
गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे व केस सुंदर होतात.
रोज जेवण करण्यापूर्वी एक खजूर खावे ज्यामुळे आपण जे अन्न खात आहोत ते व्यवस्थित पचते.
साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा प्यावा. यामुळे शरीरातील साखर वाढणार नाही.
खूप गरम पदार्थ खाल्ल्याने आपले हृदय कुमकुमत होते.
रोज सकाळी उठल्या उठल्या बुरुषातोंडी एक लसूण खावे यामुळे पोटाचे सर्व विकार नाहीसे होतात.
पोटातील उष्णता कमी करण्यासाठी उकळतं दुधामध्ये एक चमचा बडीशेप टाकून ते दूध प्यावे.
जर तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या असेल तर थंड पाणी न पिता दिवसभर कोमट पाणी पीत राहावे यामुळे तुमचे पोट साफ होईलच व पोटाभोवती जमा होणारे सर्दी देखील कमी होईल.
मधुमेह व सांधेदुखी यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथीदाण्याचे सेवन करावे.
जर तुमचे दात किडू नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर रोज संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये काळे मीठ मिसळून त्याच्या गुळण्या कराव्या व सकाळी ब्रश करावे.
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग झाले असतील तर बेसन पिठामध्ये थोडीशी हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे व चेहरा वाळल्यानंतर ते धुवावे त्यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास तर कारल्याची भाजी हा उत्तम उपाय आहे.
संध्याकाळच्या वेळेस जेवणामध्ये बटाट्याचे सेवन करू नका त्यामुळे मुळव्याधीचा त्रास होण्याची शक्यता असते.

अशाप्रकारे या काही सूचना आहेत त्या आपल्या आरोग्याशी निगडित आहेत. या सूचनेचे जर तुम्ही पालन केले तर नक्की तुमच्या आरोग्य तंदुरुस्त राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -