मित्रांनो, हिवाळ्यात थंडी जितकी प्रिय असते तितकेच हैराण घरातील डास वाढल्यामुळे होत असतो. हल्ली तर बारा महिने डास भुणभुणताना दिसून येतात. डेंग्यू, मलेरियासारखे आजार या डासांमुळेच त्रासदायक ठरतात. डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर तापांना कारणीभूत ठरणारे डास हे घरात नक्कीच त्रासदायक ठरतात. मच्छरदाणीमध्ये झोपणे, मॉस्किटो रिपीलंट असे अनेक उपाय करूनही तुम्हाला डास चावत असतील तर नक्कीच हैराण व्हायला होतं. डासांपासून सुटका हवी असेल तर काही घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतात. म्हणूनच आज आपण डास मारण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
पूर्वीच्या काळात कडुलिंब, मसाल्याची झाडे घराभोवती असायची. त्यामुळे, डासांची पैदास फारशी नसायची. पण, सध्या सायंकाळ झाली की घरभर डासांची जत्रा भरते. त्यावर अनेक उपाय आहेत पण तेही तात्पुरते काम करतात. ज्याने डास तर मरतच नाहीत. काहीवेळा डासांसाठी असलेले उपायांनी अपघातही होतात. तर त्यांच्या वासाने घशाचे आजारही होतात.
लहान मुलांच्या खोलीत जेव्हा डासांची क्वाईल लावली जाते तेव्हा ते सांगूनही ऐकत नाही. ते क्वाईल पकडायला जाते. त्यामुळे त्याला इजा होऊ शकते. तर लिक्विडने मुलांना त्रासही होतो. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याचा एक सरळ सोप्पा उपाय आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. डासांच्या या उपायाने घरातील हवाही शुद्ध होईल आणि ज्याचा आपल्याला त्रासही होणार नाही.
डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जो उपाय करणार आहोत, त्यासाठी मुठभर कडुलिंबाची पाने (कोरडी), 8 ते 10 तमालपत्र, कांद्याची साले, 3 ते 4 लवंग आणि कापूर लागेल. आता हा उपाय कसा बनवायचा ते पाहुयात. सर्व प्रथम सुक्या कडुलिंबाची पाने कुस्करून घ्या, नंतर त्यात लसणाची साले, तमालपत्र, लवंगा आणि कापूर एकत्र करा आणि ग्राइंडरमध्ये बारीक करा. नंतर पावडर सारखे झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
आता रोज संध्याकाळी ही पावडर मातीच्या दिव्यात टाकून त्यात कापूरचा तुकडा टाकून जाळून टाका. हा दिवा अशा ठिकाणी ठेवा की त्याचा धूर संपूर्ण घरात पसरेल. मग पहा डास घरातून कसे पळून जातात.ही पावडर बनवताना वापरल्या जाणाऱ्या घटकांचा वास डासांना आवडत नाही, म्हणून ही गावठी उपाय रेसिपी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
अशाप्रकारे आपण घरच्या घरी काही साधनांचा वापर करून घरातील डास दूर करू शकतो. तेही केमिकल विरहित साधनांचा वापर न करता.