Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाचाहत्यांसाठी बॅडन्यूज, आजच्या सामन्यात पाऊस पडला तर टीम इंडिया…

चाहत्यांसाठी बॅडन्यूज, आजच्या सामन्यात पाऊस पडला तर टीम इंडिया…

टी-२० वर्ल्डकपच्या आतापर्यंतच्या अनेक सामन्यांमध्ये पाऊस पडल्याने खेळ बिघडवला आहे. अनेक संघाना यामुळे फटका बसला आहे. आज भारत आणि बांगलादेश यांच्या सामना होणार आहे. पण या सामन्यत जर पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर भारतासाठी काय असेल पुढची परिस्थिती जाणून घ्या.

 

टी-20 विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. भारतीय संघ अजूनही खूप चांगली कामगिरी करु शकलेला नाही. संघाने आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका यांना पराभूत करत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अफगाणिस्तानचा सहज पराभव केलाय. भारतीय संघ सुपर-8 च्या पुढील सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास नक्की करणार आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघाला चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.

 

भारतासाठी सर्वात मोठी चिंता कोणती?

भारतीय संघाची ओपनिंग जोडी आतापर्यंत काही खास करु शकलेली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही दिग्गज जोडी ओपनिंगला येत आहे. पण आतापर्यंत रोहितने चार सामन्यांत २५.३३ च्या सरासरीने ७६ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. विराट आतापर्यंत फॉर्मात दिसला नाही. त्याने चार सामन्यांत 7.25 च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ 29 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 24 आहे. विराटच्या खराब कामगिरीमुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव वाढलाय. ऋषभ पंतने 4 सामन्यात 116 धावा आणि सूर्यकुमार यादव 4 सामन्यात 112 धावा केल्या आहेत. कठीण काळात या दोघांनी चांगली भूमिका पार पाडलीये. पण तरी स्पर्धेतील मोठ्या सामन्यांमध्ये या दिग्गजांची कामगिरी कशी असेल याबाबत चिंता आहे.

 

भारत आणि बांगलादेश आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने 12 सामने जिंकलेत कर बांगलादेशने 1 सामना जिंकलाय.

 

सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली आहे. सीम गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही येथे मदत मिळतेय. सध्याच्या स्पर्धेत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जो जिंकेल त्याला फायदा अधिक होऊ शकतो.

 

हवामान वाढवणार चिंता

शनिवारी येथे अंशतः ढगाळ वातावरण असेल. सामन्यादरम्यान पावसाची 20% शक्यता आहे. येथे तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. या टी-२० विश्वचषकातील अनेक महत्त्वाचे सामन्यात पावसाने खेळ बिघडवला आहे. हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

 

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

 

बांगलादेश : तनझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हसन शांतो (क), शकीब अल हसन, तौहीद हृदय, महमुदुल्ला, झाकीर अली, तन्झिद हसन शाकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -