Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीचंदुरात सेवाभारतीचे ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू

चंदुरात सेवाभारतीचे ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू

इचलकरंजी : सर्वसामान्य लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी नेहमी आघाडीवर असलेल्या सेवाभारती रुग्णालयाचे काम आदर्शवत आहे. अनेक शासकीय आरोग्य योजनांसाठी या रुग्णालयाची शासनास मदत होते. त्यामुळे रुग्ण सेवेसाठी सुरू केलेल्या सेवाभारतीच्या ग्रामीण आरोग्य केंद्राला शासनही नेहमी सहकार्य करेल, अशी भावना चंदूर (ता.हातकणंगले) येथे आभार फाटा परिसरात सेवाभारती ग्रामीण आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश दातार यांनी व्यक्त केली.

यावेळी उद्योगपती दशरथ मलकापुरे, सेवाभारतीचे अध्यक्ष भगतराम छाबडा, सरपंच स्नेहल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

छाबडा म्हणाले, नर सेवा हीच नारायण सेवा, या भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सेवाभारती रुग्णालय सुरू केले. या माध्यमातून अल्प दरात आरोग्य सेवा पुरविल्या जातात. चंदूर गावामध्ये आठवड्यातून दोन दिवस फिरते रुग्णालय येत होते. आता पूर्णवेळ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही सेवा नियमित राहणार असल्याचे सांगत सेवाभारतीच्या कार्याविषयी माहिती दिली.

स्वागत अतुल आंबी यांनी केले. सेवाभारतीचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश पवार यांनी प्रास्ताविकात सेवाभारतीच्या उपलब्ध रुग्णसेवा व रुग्णालय कामकाजाचा आढावा घेतला. त्यामध्ये या सेवा केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना अल्प दरात तपासणी व औषधे, त्याचबरोबर दंत उपचार, रक्त-लघवी तपासणीसाठी कलेक्शन केंद्र सुरू केले आहे. काही दिवसांतच प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रही सुरू होणार असल्याचे सांगितले.

लक्ष्मण मलकापुरे यांनी केंद्राच्या उभारणीची माहिती सांगितली. यावेळी पं.स.चे माजी सभापती महेश पाटील, उपसरपंच ललिता पुजारी, वैशाली पाटील, पोलिसपाटील राहुल वाघमोडे, रावसाहेब गुरव, सुनील संकेश्वरे, लक्ष्मी कांबळे, आदींसह गावातील विविध मान्यवर तसेच सेवाभारतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी – चंदूर (ता.हातकणंगले) येथे आभार फाटा परिसरात सेवाभारती ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश दातार यांनी केले. यावेळी उद्योगपती दशरथ मलकापुरे, सेवाभारतीचे अध्यक्ष भगतराम छाबडा, सरपंच स्नेहल कांबळे, महेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -