Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानबजाज या तारखेला लॉन्च करणार देशाची पहिली CNG बाईक? इंजिनपासून फ्युल कॉस्टपर्यंत...

बजाज या तारखेला लॉन्च करणार देशाची पहिली CNG बाईक? इंजिनपासून फ्युल कॉस्टपर्यंत काय आहे वैशिष्ट्ये, जाणून घ्या 

२५ वर्षांपूर्वी भारतात CNG-चालित ऑटो रिक्षा सादर करणारी बजाज ऑटो ही पहिली उत्पादक कंपनी होती, ज्याने सार्वजनिक वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आहे. आता, जेव्हा प्रवासी वाहनांमध्ये, विशेषत: फ्लीट आणि शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रात सीएनजी ही एक सामान्य गोष्ट ठरली आहे, तेव्हा बजाज पुन्हा एकदा बाजारपेठेत एक नवीन क्रांती घडवणार आहे, जी सीएनजी बाईकच्या रूपाने जगासमोर येईल.

बजाज दीर्घकाळापासून सीएनजी बाईकवर काम करत आहे आणि गेल्या वर्षभरात या सीएनजी बाईकची चाचणी अनेक वेळा पाहण्यात आली आहे. बाईक ५ जुलै २०२४ रोजी अधिकृत पदार्पण करणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात बजाज CNG बाईकचे अनावरण होणार आहे. आगामी CNG बाइकच्या नावाबाबत अजूनही संदिग्धता आहे. पण चाकण-आधारित बाईक निर्मात्याने अलीकडेच भारतात ट्रेडमार्क केलेल्या या बाईकला ‘ब्रुझर’ म्हटले जाऊ शकते असे अहवालात सुचवले आहे. CNG बाईकचा परिचय हा भारत सरकारने गेल्या दशकात शाश्वत पर्यायी इंधनाच्या दिशेने उचललेल्या पावलांचा एक भाग आहे.

देशाच्या बहुतांश भागांमध्ये पेट्रोलच्या किमती १०० रुपयांच्या आसपास आहेत आणि पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यासाठी अजून खूप वेळ आहे. CNG किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे दुचाकी वाहनांसाठी योग्य पर्यायी उपाय ठरू शकतात आणि बजाज त्याचा फायदा घेणारे पहिले ठरणार आहे.

बजाज सीएनजी बाइक: अपेक्षित तपशील

बजाज सीएनजी बाईक बहुधा डबल क्रॅडल फ्रेमवर आधारित असेल आणि त्यात ‘स्लोपर इंजिन’ असू शकते. या इंजिनाबाबत नेमका तपशील अद्याप समोर आलेले आहेत. हे ११०-१५० सीसी इंजिन असण्याची अपेक्षा आहे. नवीन CNG बाईकमध्ये १२५ सीसी इंजिन असेल जे पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालू शकेल आणि वेगवेगळ्या इंधनांमधील ट्रॉन्झीशन सोपे आणि अंखड असेल.

अतिरिक्त रेंज देण्यासाठी आणि CNG संपल्यास बॅकअप म्हणून काम करण्यासाठी या बाईकमध्ये एक लहान पेट्रोल टाकी देखील देण्यात आली आहे. विशेषत: किंमतीबद्दल जागरूक खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले, बजाजचा दावा आहे की, आगामी CNG बाइक ऑपरेटिंग आणि इंधन खर्च ५०-६५ टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम असेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -