सध्याच्या काळात रोकडचा वापर आपण कमी करतो आणि ऑनलाईन व्यवहार करतो. बहुतेक जण ऑनलाईन शॉपिंग करतात आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करतात. पण तुम्ही आपल्या पत्नीच्या बँक अकाऊंटमध्ये दर महिन्याला पैसे ट्रान्सफर करतात का?
मग तुमच्या पत्नीला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते. जाणून घेऊयात यामागचं काय आहे कारण…
तुम्ही आपल्या घरखर्चासाठी प्रत्येक महिन्याला पत्नीला पैसे देता किंवा गिफ्ट म्हणून काही रक्कम देत आसल तर पत्नीला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. कारण, या दोन्ही प्रकारच्या रक्कम पतीचं उत्पन्न मानलं जातात.
पत्नीचं इन्कम असेल तर…
पण तुम्ही आपल्या पत्नीला दर महिन्याला घरखर्चासाठी पैसे देत असाल आणि पत्नी हे पैसे कुठेतरी गुंतवणूक करत असेल. या गुंतवणुकीतून उत्पन्न मिळत असेल तर अशा परिस्थितीत पत्नीला इन्कम टॅक्स भरावा लागेल. वर्षाला मिळणारे एकूण उत्पन्नाच्या आधारावर इन्कम टॅक्स आकारण्यात येईल. कारण, तुम्ही पत्नीला दिलेले पैसे हे कुठेतरी गुंतवणूक करुन त्याद्वारे उत्पन्न मिळवले जाते आणि हे पत्नीचे उत्पन्न मानले जाते. गुंतवणुकीवर वर्षानुसार पत्नीचे इन्कम मानले जाईल आणि त्यावर टॅक्स आकारण्यात येईल.
इन्कम टॅक्स कायदा काय सांगतो?
पत्नी ही नातेवाईक श्रेणीत येते. त्यामुळे गिफ्ट म्हणून झालेल्या आर्थिक व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही. इन्कम टॅक्स कायद्यानुसार, जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त तुमच्या पत्नीला भेट म्हणून पैसे दिले तर ते कायदेशीररित्या चुकीचे नाही. तसेच त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कर सूट मिळणार नाही. म्हणजेच पत्नीला टॅक्स भरावा लागणार नाही. तर टॅक्स भरण्याची जबाबदारी पतीची असणार आहे.
इन्कम टॅक्स कायद्यानुसार, जर तुम्ही तुमच्या उत्पन्नातून पैसे वेगळे करुन पत्नीला गिफ्ट म्हणून दिले तर ते तुमचे उत्पन्न मानले जाईल आणि त्यावर तुम्हालाच कर भरावा लागेल.
पत्नीची गुंतवणूक
तुम्ही पत्नीच्या बँक खात्यात ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला खर्चासाठी ट्रान्सफर करत असाल. त्यापैकी ठराविक रक्कम पत्नी एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असेल (उदाहरणार्थ, एसआयपी, म्युच्युअल फंड, एफडी) तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणार नाही. हे उत्पन्न पतीचे मानले जाईल आणि त्यावर पतीला टॅक्स भरावा लागेल.