Sunday, September 8, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस शक्य, आतापर्यंत सरासरी 153 किलोमीटर पावसाची नोंद

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस शक्य, आतापर्यंत सरासरी 153 किलोमीटर पावसाची नोंद

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

येत्या दोन दिवसात जिल्ह्यात संततधार सुरु होणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

जून महिना संपत आला तरी मान्सूनला ताकद लागेना. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सरासरीच्या ४८ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, गेल्यावर्षी पेक्षा यंदा पाऊस चांगला झाला आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये सरासरी ५३.२ मिलीमीटर (१६ टक्के) पाऊस झाला होता.

बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ७.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात २१.५ मिली मीटर असून गगनबावडा, भुदरगडसह धरणक्षेत्रात चांगला पाऊस आहे. पाटगाव व कासारी धरणक्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

शेतकऱ्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. बुधवारपासून वातावरणात बदल होत असून दोन दिवसात संततधार पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कीड व तणाला पोषक वातावरण

पावसाची उघडीप, ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांसाठी नुकसानकारक आहे. कीडाचा प्रार्दुभाव वाढण्याचा धोका असून विशेष करुन वेलवर्गीय पिकांना अशा वातावरणाचा अधिक फटका बसतो. उघडझाप राहिल्याने पिकांमधील तणाला पोषक ठरते. यासाठी पावसाची गरज असून सततच्या पाण्यामुळे तणाला ताकद लागत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -