जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतील बंधारा हा पाण्याखाली गेला असून पाणी पातळीमध्ये वाढ होतानाचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे. नदीकाठचा घाट परिसर पाण्याखाली जात असून इचलकरंजी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा ही सतर्क झाली आहे. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची इशारा पातळ 69 फूट असून धोका पातळी ही 71 फुटांवर आहे.
दरम्यान पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड तर कासारी नदीवरील येवलुज असे सात बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. सात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.