Tuesday, August 5, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाडा, विदर्भात धरणीकंप; परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के

मराठवाडा, विदर्भात धरणीकंप; परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के

नांदेड : मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 10 जुलै रोजी पहाटे झालेल्या याधरणीकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत भूकंपाचा धक्का जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचा धक्का बसला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवला आहे. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.

हिंगोली जिल्ह्यातही धरणीकंप, जीवितहानी नाही

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरालासुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीत झालेला हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.

वाशिममध्ये नागरिकांत भीती

मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावात परिसरात घरावरील टीन पत्राचा मोठा आवाज झाला. गोठ्यात बांधलेली गुरेदेखील या भूकंपामुळे भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले. जनावरे रावैरा होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नांदेड, जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के

मराठवाड्यातील नांदेड तसेच जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नांदेड जिल्ह्यात सकाळी 7.15 वाजता हे धक्के जाणवले. तर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -