Tuesday, August 5, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी तालुका करा, कबनूर ला नगरपरिषद करा : आ. आवाडे 

इचलकरंजी तालुका करा, कबनूर ला नगरपरिषद करा : आ. आवाडे 

इचलकरंजी –

इचलकरंजीसह परिसरातील औद्योगीकरण वाढत चालले आहे. इचलकरंजी हे प्रगत औद्योगिक शहर असून या ठिकाणी स्वतंत्र तहसील कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे 28 वर्षापासून प्रलंबित इचलकरंजी स्वतंत्र तालुका जाहीर करावा अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी विधानसभा पावसाळी अधिवेशनात केली. त्याचबरोबर कबनूरला नगरपरिषद करण्यासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीन व आवश्यक स्टाफ तातडीने उपलब्ध करून देणाची मागणी त्यांनी केली.

मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी अधिवेशनात विविध विषयावर चर्चा करत प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणूकीची मागणी केली. ते म्हणाले, इचलकरंजी हे प्रगत औद्योगिक शहर आहे. शहरासह परिसराचा औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी सन 1985 पासून सातत्याने केली जात आहे. याठिकाणी प्रांत कार्यालय असून महानगरपालिकाही झाली आहे. त्यामुळे केवळ मंजुरी न देता इचलकरंजी स्वतंत्र तालुका जाहीर करावा अशी मागणी केली.

इचलकरंजी लगतच 70 हजार लोकसंख्येचे कबनूर हे गाव आहे. आणि हे गाव एक ग्रामसेवक सांभाळत आहे. लोकसंख्येच्या मानाने सुविधा पुरविताना दमछाक होत आहे. 50 हजार लोकसंख्येला नगरपरिषद करावी असा कायदा असताना हा प्रश्न प्रलंबित आहे. तातडीने कबनूर नगरपरिषद करण्यास मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी व्हावी. त्याचबरोबर कबनूरपासून काही अंतरावर असलेल्या 10 हजार लोकसंख्येच्या साजणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी कबनुरकरांना जावे लागते. त्यामुळे आभारफाटा चंदूर याठिकाणी असलेल्या महिला बचत भवनची वापराविना असलेल्या इमारतीत साजणीचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतर करावे. त्याचा कबनूरसह आसपासच्या गावाना लाभ होईल.

वाढत्या औद्योगिकरणाबरोबरच ग्रामीण भागात मिळेल तेथे जागा घेऊन वस्त्या वाढत आहेत. पण ग्रामपंचायत तेथे आवश्यक सुविधा देऊ शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली.

इचलकरंजीतील सध्याचे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे शासनाने सन 2016 मध्ये ताब्यात घेतले. त्यावेळी दरवर्षी 11 कोटी रुपये खर्चासाठी देण्यास मंजूर केले होते. पण आजपर्यंत तो निधी मिळालेला नाही. हे रुग्णालय चांगल्या पद्धतीने सुरु असून 300 बेडचे झाले आहे. पण त्यामानाने स्टाफ कमी असल्याने मंजूर 147 स्टाफसह एमआरआय मशीन उपलबध करून देण्याची मागणी आमदार आवाडे यांनी केली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -