Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषद निवडणुकीतील पडद्यामागची मोठी बातमी, मोठा राजकीय गेम होणार?

विधान परिषद निवडणुकीतील पडद्यामागची मोठी बातमी, मोठा राजकीय गेम होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक विधान भवनातील पक्ष कार्यालयात पार पडली. विधान परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान परिषद निवडणुकीत कसं मतदान करायचं आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची? याची माहिती आणि मार्गदर्शन या बैठकीत देण्यात आलं.

 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीकडून 1 उमेदवार जास्त देण्यात आल्याने राजकीय चुरस वाढली आहे. पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार या निवडणुकीत सहज जिंकून येऊ शकतात. पण महायुतीकडून 9 जणांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणुकीतला सस्पेन्स वाढला आहे. विशेष म्हणजे सर्व 9 जागा जिंकून आणणारच असा निर्धार महायुतीच्या नेत्यांचा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे. या तीनही पक्षांच्या आमदारांची संख्या पाहता त्यांचे प्रत्येकी एक आमदार सहज निवडून येऊ शकतात. पण महायुतीने एक उमेदवार जास्त दिल्याने महाविकास आघाडीतही धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे सर्व 9 उमेदवार जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परीषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांना निवडून आणण्याची सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परीषद निवडणुकीत महाविकास आघाडीला दे धक्का देणार आहेत. विधान परीषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लान तयार असल्याची माहिती मिळत आहे. विधान परीषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवारांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची एकत्र मोट बांधली आहे.

 

मुख्यमंत्री स्वत: सर्वांशी संपर्क ठेवून

महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांच्या अंतर्गत बैठका पार पडल्यानंतर सर्व मतदार आमदारांचे विजयी गणित मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक चाली रचल्या आहेत. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, महायुतीमधील पक्ष, घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांशी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क ठेवून आहेत. महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मतं त्यानंतर दुसऱ्या आणि तीसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची याची सांख्यिकी रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवली आहे.

 

मैदानात कोण कोण?

भाजपचे उमेदवार

1) पंकजा मुंडे

2) परिणय फुके

3) सदाभाऊ खोत

4) अमित गोरखे

5) योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

1) शिवाजीराव गर्जे

2) राजेश विटेकर

शिवसेना

1) कृपाल तुमाने

2) भावना गवळी

शिवसेना – उबाठा

1) मिलिंद नार्वेकर

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार

1) जयंत पाटील (शेकाप)

काँग्रेस

1) प्रज्ञा सातव

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -