सोने आणि चांदीच्या किंमतीत दोन दिवसात दरवाढ झाली. तर आठवड्याच्या मध्यंतरात किंमती घसरल्या. ग्राहकांना मौल्यवान धातूंनी गेल्या काही दिवसांपासून मोठा दिलासा दिला आहे. त्यांना खरेदीची संधी मिळाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा उलटफेर झाला. किंमतीत विक्रमी घसरण झाली. मौल्यवान धातूच्या किंमतीत या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढ नोंदवली. त्यामुळे आता पुन्हा किंमती भडकतात की काय अशी चिंता लागली होती. पण दुसऱ्याच दिवशी दोन्ही धातूंनी माघार घेतली. ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली. आता काय आहेत या धातूचा भाव?
दरवाढीनंतर सोन्याची माघार
गेल्या दहा दिवसांपासून सोन्यामध्ये घसरणीचे सत्र सुरु होते. अर्थसंकल्पानंतर तर सोन्याच्या किंमतीत विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याची किंमत वाढली. 270 रुपयांची दरवाढ झाली, मंगळवारी भाव 210 रुपयांनी उतरले. आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी उतरली
चांदीत गेल्या दोन आठवड्यापासून घसरणीचे सत्र होते. या आठवड्यात 29 जुलै रोजी या घसरणीला ब्रेक लागला. आतापर्यंत चांदीत 7,000 रुपयांची घसरण दिसली. तर सोमवारी चांदीत 500 रुपयांची दरवाढ झाली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली. आज सकाळच्या सत्रातही चांदीने घसरणीचे संकेत दिले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,680, 23 कॅरेट 68,405, 22 कॅरेट सोने 62,911 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,510 रुपये, 14 कॅरेट सोने 40,178 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,350 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.