Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगआज बँक बंद राहणार की सुरू? तुमच्या भागात काय स्थिती चेक करा

आज बँक बंद राहणार की सुरू? तुमच्या भागात काय स्थिती चेक करा

प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या बदलणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसात तुमची कामं होणार नाहीत हे निश्चित त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडण्याआधी बँक सुरू आहे की नाही ते एकदा तपासून पाहा.

 

सोमवार, 26 ऑगस्ट, 2024 रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. जन्माष्टमीनिमित्तानं बँक बंद राहणार असली तर दहीहंडीच्या दिवशी बँक बंद ठेवायची की जन्माष्टमीच्या दिवशी हा निर्णय त्या त्या राज्यानुसार घेतला जाणार आहे. ग्राहकांना सुट्ट्यांचं अचूक वेळापत्रक काळवं यासाठी त्यांनी स्थानिक शाखेत चौकशी करावी असं आवाहन RBI ने केलं आहे.

 

आज कुठे बंद राहणार बँक

अहमदाबाद (गुजरात), भोपाळ (मध्य प्रदेश), भुवनेश्वर (ओडिशा), चंदीगड (केंद्रशासित प्रदेश), चेन्नई (तामिळनाडू), डेहराडून (उत्तराखंड), गंगटोक (सिक्कीम), हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) येथे बँका बंद राहतील. , जयपूर (राजस्थान), जम्मू, श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर), कानपूर (उत्तर प्रदेश), कोलकाता (पश्चिम बंगाल), लखनौ (उत्तर प्रदेश), पाटणा (बिहार), रायपूर (छत्तीसगड), रांची (झारखंड), शिलाँग ( मेघालय), शिमला (हिमाचल प्रदेश).

 

तुम्हाला छोटी कामं जसे की पैसे ट्रान्सफर करणं EKYC सारख्या गोष्टी या ऑनलाईन बँकिंगद्वारे करता येणार आहेत. मात्र मोठी कामं किंवा बँकेशी संबंधित इतर कामं करायची असल्यास तुम्हाला शाखेतूनच करावी लागणार आहेत.

 

मुंबई आणि नवी दिल्ली सारख्या प्रमुख वित्तीय केंद्रांमधील बँका नेहमीप्रमाणे खुल्या राहतील. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये आज बँकेचं काम सुरू राहणार आहे. मात्र दहीहंडीनिमित्ताने मंगळवारी काही ठिकाणी शाखा बंद राहण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तुम्ही स्थानिक पातळीवरही एकदा बँक बंद राहणार की नाही ते तपासून घ्यावे.

 

जन्माष्टमी, ज्याला कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, विष्णूचा आठवा अवतार भगवान कृष्णाचा जन्म देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जन्माष्टमीचा उत्साह देशभरात आज पाहायला मिळत आहे. जन्माष्टमीनिमित्ताने काही सरकारी काही खासगी संस्थांना सुट्टी देखील स्थानिक पातळीवर देण्यात आली आहे.आज बँक बंद राहणार की सुरू? तुमच्या भागात काय स्थि

ती चेक करा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -