Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात घडणार व्यावसायिक वैमानिक, विमानतळ परिसरात स्वतंत्र क्लासरूम पुढील वर्षी होणार सुरू

कोल्हापुरात घडणार व्यावसायिक वैमानिक, विमानतळ परिसरात स्वतंत्र क्लासरूम पुढील वर्षी होणार सुरू

कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल्स इमारतीमुळे कोल्हापूरचे नाव सर्वत्र झाले आहे. त्यामध्ये आता वैमानिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात सुरू होत असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता पडणार नाही.

 

कोल्हापुरात घडणार व्यावसायिक वैमानिक

 

कोल्हापूर विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण मुंबई एव्हिएशन अॅकॅडमीच्या वतीने देण्यात येणार आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्र लवकर सुरू करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यासाठी कोल्हापूर विमानतळावर केंद्राला जागाही देण्यात आली आहे.

 

कंपनीच्या वतीने अन्य काही अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील वर्षांपर्यंत विमानतळावर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संबंधित कंपनीचा मानस आहे. त्यामुळे स्थानिकांसह अन्य विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लेखी व प्रात्यक्षिक स्वरूपात हा अभ्यासक्रम असणार आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात स्वतंत्र क्लास रूमही तयार करण्यात येणार आहे.

 

संपूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना खासगी कंपनीत नोकरीचीही संधी मिळणार आहे. विमान प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिकांना नोकरीची संधी यामधून उपलब्ध होणार आहे.

 

विमानाच्या घिरट्या

 

कोल्हापूर येथील विमानळावर व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यावर प्रशिक्षणासाठी तीन ते चार विमानेही आणण्यात येणार आहेत. ही विमाने दोन किंवा चार आसनाची असतील. त्यामुळे शहरावर कायमस्वरूपी विमाने घिरट्या घालत असल्याचे चित्र दिसणार आहे.

 

कराडच्या धर्तीवर कोल्हापुरात हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यापूर्वी सर्व विभागांकडून ना हरकत घेण्याची प्रक्रिया सध्या कंपनीकडून सुरू आहे. ती प्रक्रिया पार पडल्यानंतर लवकरच कोल्हापुरात प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि प्रशिक्षित हवाई वाहतूक कर्मचारी उपलब्ध होतील.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -