Wednesday, September 27, 2023
Homeकोल्हापूरकोल्हापुरात मालगाडीचा डबा उलटला; चौघांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापुरात मालगाडीचा डबा उलटला; चौघांची प्रकृती चिंताजनक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर मधील मार्केट यार्ड येथे रेल्वे मालगाडीचा एक डबा उलटला आहे. या मालगाडी खाली किमान ५ ते ६ कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज दुपारी ही घटना घडली आहे.

रेल्वेची मालवाहतूक करणारी बोगी पलटी होऊन सहा कामगार जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या चौघांची प्रकृती गंभीर आहे. मार्केट यार्ड क्रमांक तीन वर आज (सोमवार) दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे मार्केटयार्ड परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणा आणि माथाडी कामगार यांच्यासह नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

बोगीमध्ये अडकलेल्या कामगारांना युद्धपातळीवर बाहेर काढण्यात आले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या बोगीतून सिमेंट पोती उतरून घेत असताना अचानक उजव्या बाजूला सिमेंट पोत्यांसह बोगी पलटी झाली. यामध्ये कामगार जखमी झाले आहेत.

जखमीं मध्ये सुरेश पांडूरंग साधू गडे (वय 42), शिराज शब्बीर आदल खान (30), पांडू पंडित गेंड (वय 35), सनीउल्ला उल्लामन शेख (41), सादिक शब्बीर शेख (वय 45), मुजाहिदीन इमतियाज मुजावर (वय 45) राहणार सर्व विक्रमनगर कोल्हापूर यांचा समावेश आहे. यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र