ताजी बातमी ऑनलाईन टीम
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मागील आठवडाभर नेत्यांसह इच्छुकांनी वाजत-गाजत उमेदवारी अर्ज भरले. या अर्जांची सोमवारी छाननी होणार आहे. 21 जागांसाठी 275 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी तब्बल 370 अर्ज दाखल झाले आहेत. यातील सुमारे 100 हून अधिक दुबार नावांसह अपात्र उमेदवारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 7 ते 21 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर पडद्यामागील घडामोडी वेगावणार आहेत. जिल्हा बँकेसाठी 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. आजी माजी-मंत्री, आमदार, खासदार, संचालकांसह तब्बल 275 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
तालुकास्तरावर होणार्या सेवा संस्था गटातील निवडणुकीत ताकदवान नेताच तग धरणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे या 12 जागा वगळता इतर 9 जागांवर वर्णी लावून घेण्यासाठी मोठी चुरस आहे. मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी तब्बल 49 इच्छुक आहेत. बँक आणि पतसंस्था गटासाठी 44, महिला गटातील दोन जागांसाठी 42 तर दूध संस्था गटातून 39 अर्ज आले आहेत.
प्राप्त 370 अर्जांची सोमवारी दिवभर छाननी केली जाणार आहे. पात्र उमेदवारांची यादी 7 डिसेंबरला प्रसिद्ध केल्यानंतर माघार नाट्याला सुरुवात होईल. 21 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. यादरम्यान बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मोजक्या जागांसाठी निवडणूक लागेल, असे सध्याचे राजकीय चित्र आहे.
कोल्हापूर जिल्हा बँक अर्जांची आज होणार छाननी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -