फुड डिलिव्हरी सेगमेंटमद्ये स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) या प्रमुख कंपन्यांत नेहमी स्पर्धा असते. या दोन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे आकर्षक निर्णय घेतात. लवकरच स्विगी या कंपनीचा आयपीओ येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी कोट्यवधी रुपये उभे करणार आहे. दरम्यान, आयपीओ येण्याआधी ही कंपनी मोठे निर्णय घेत आहे. आता या कंपनीने स्विगी बोल्ट नावाचे नवी व्यवस्था आणली आहे. या व्यवस्थेअंतर्गत अगदी दहा मिनिटांत ऑर्डक केलेले जेवण मिळणार आहे.
आयपीओ येण्याआधी मोठे निर्णय
स्विगीच्या आयपीओची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. लवकरच या कंपनीचा आयपीओ येार आहे. झोमॅटो या कंपनीचा आयपीओ याआधीच आलेला आहे. सध्या ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेली आहे. त्यानंतर आता स्विगीनेदेखील कंबर कसली आहे. स्विगीचा आपयीओ लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तत्त्पूर्वी स्विगीने दिल्ली-एनसीआरच्या तीन सहरांत रात्र आणि दिवस असे 24 तास फुड डिलिव्हरी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शुक्रवारी या कंपनीने आम्ही फक्त 10 मिवनिटांत फुड डिलिव्हरी करू असे सांगितले आहे. या व्यवस्थेला कंपनीने स्विगी बोल्ट असं म्हटलंय. सुरुवाताली ही सुविधा प्रमुख 6 शहरांत चालू करण्यात आलंय.
10 मिनिटांत फुड डिलिव्हरीचं आश्वासन
आतापर्यंत या प्रकारच्या रणनीतीचा उपयोग क्विक कॉमर्स क्षेत्रात केला जायचा. क्विक मार्केट क्षेत्रातही स्विगी आणि झोमॅटो हे एकमेकांचे प्रमुख स्पर्धक आहेत. या क्षेत्रात स्विगीचा इन्टामार्ट (Instamart) तर झोमॅटोचा ब्लिंकिट (Blinkit) गा बँड क्विक कॉमर्समध्ये एकमेकांचे स्पर्धक आहेत. स्विगीने दिलेल्या माहितीनुसार स्विगी बोल्टच्या माध्यमातून चुम्ही बर्गर, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, ब्रेकफास्ट तसेच बिर्याणी असे खाद्यपदार्थ मागवू शकता. या पदार्थांना तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे स्विगी बोल्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे खाद्यपदार्थ 10 मिनिटांत देऊ, असं स्विगीने म्हटलंय. सुरुवातीला स्विगी बोल्ट हे फिचर हैदराबाद, मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई आणि बंगळुरू येथे चालू करण्यात आले आहे. लवकरच हे फिचर अन्य शहरांतही चालू केले जाईल. .
स्विगी बोल्ट अंतर्गत ऑर्डर कशी द्यायची?
स्विगीने दिलेल्या माहितीनुसार आईसक्रीम, मिठाई आणि स्नॅक्सची डिलिव्हरीदेखील बोल्ट या फिचरअंतर्गत केली जाईल. मात्र त्यासाठी ग्राहकांना 2 किमीच्या परिसरात असलेल्या रेस्टॉरंन्टवरूनच खाद्यपदार्थ ऑर्डर करावे लागणार आहेत. या कंपनीने ऑर्डर पोहोचवण्याचा कालावधी 30 मिनिटांपर्यंत कसा कमी होऊ शकतो, यावर काम केलं आहे. त्यानंतर आता ऑर्डरचा वेळ 10 मिनिटांपर्यंत कसा येईल, यावर या कंपनीचं काम चालू आहे.