Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरअभिमानास्पद! कोल्हापूरच्या लीना बनल्या फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanel च्या सीईओ

अभिमानास्पद! कोल्हापूरच्या लीना बनल्या फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanel च्या सीईओ

मूळ भारतीय असलेल्या ५२ वर्षीय लीना नायर  यांची फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanelच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे. लीना नायर ह्या आतापर्यंत युनिलिव्हरमध्ये मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आता त्या जानेवारीमध्ये फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanelच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे लीना ह्या मुळच्या कोल्हापूरच्या आहेत.लीना यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये १९९२ मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करियरची सुरुवात केली होती. तिथे त्या Chief human resources officer  पदापर्यंत पोहोचल्या. हिंदुस्तान लिव्हरने नंतर आपले नाव बदलून युनिलिव्हर असे केले. तिथे लीना ह्या पहिल्या आशियाई आणि कमी वयाच्या CHRO बनल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -