Saturday, October 12, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर विमानतळाचा नाईट लँडिंगचा पहिला टप्पा पार

कोल्हापूर विमानतळाचा नाईट लँडिंगचा पहिला टप्पा पार

कोल्हापूर विमानतळ वरील नाईट लँडिंगचा पहिला टप्पा मंगळवारी पार पाडला. कोल्हापूर विमानतळाला ‘आयएफआर’ परवाना मिळाला आहे. यामुळे कमी द़ृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ करता येणार आहे. परिणामी कमी द़ृश्यमानतेमुळे ऐनवेळी विमानाचे लँडिंग अथवा टेकऑफ रद्द करावे लागत होते. असे प्रकार यापुढे होणार नाहीत.कोल्हापूर विमानतळाकडे  ‘3 सी व्हीआरएफ’ परवाना होता. त्याची मुदत आज (दि. 14 डिसेंबर) पर्यंत होती. हा परवाना नूतनीकरण करतानाच तो अपग्रेड करण्यासाठीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कोल्हापूर विमानतळाचा ‘3 सी व्हीआरएफ डे लाईट’ हा परवाना अपग्रेड करून तो आता ‘3 सी आयएफआर’ परवाना देण्यात आला.

कोल्हापूर विमानतळाला ‘3 सी आयएफआर’ परवाना मिळाल्याने नाईट लँडिंगच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. या परवान्यानुसार विमानतळावर होणार्‍या ‘ऑपरेशन’ (विमानांची ये-जा) वर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कमी द़ृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ होताना सुरक्षिततेच्या द़ृष्टीने कोणत्या अडचणी येतात का, याची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये कोणत्या अडचणी आल्या तर त्या दूर केल्या जातील, जर अडचणी आल्या नाही तर नाईट लँडिंगची पुढील प्रक्रिया आणखी वेगाने पार पडणार आहे.

कोल्हापूर विमानतळावर येणार्‍या फ्लाईटला विलंब झाला की अनेकदा त्या रद्द करण्याची वेळ येत होती. सायंकाळी लँडिंग होऊन पुन्हा टेकऑफ करेपर्यंत आवश्यक दृश्यमानता नसल्याचे कारण दिले जात होते. यामुळे दोन वेळा टेकऑफसाठी रनवेवर गेलेल्या फ्लाईट रात्रभर विमानतळावर थांबून ठेवाव्या लागल्या. अनेकदा पाऊस आणि धुक्यामुळे फ्लाईट रद्द झाल्या. तर दृश्यमानता नसल्याने अनेकदा फ्लाईट उशिरा येतात. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. असे सर्व प्रकार आता बंद होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -