Friday, June 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पुलाची शिरोलीत कारच्या धडकेत भुयेचा तरूण ठार

कोल्हापूर : पुलाची शिरोलीत कारच्या धडकेत भुयेचा तरूण ठार

कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर पुलाची शिरोली, सांगली फाटा येथे भरधाव कारची दुचाकीस जोराची धडक बसून झालेल्या अपघातात भुये येथील तरूण जागीच ठार झाला. हा अपघात आज मंगळवारी (दि.२५) दुपारी झाला.

 

अपघातातील मयत तरूणाचे नाव सुरज संजय पाटील ( वय २७ रा. भुये ता. करवीर ) असे असून सुरजच्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. सुरज हा मंगळवारी दुपारी सांगली फाटा येथील मार्बल लाईनला फरशी पाहण्यासाठी गेला होता. फरशी पाहून घरी जात असताना सांगलीहून कोल्हापूरकडे येत असलेल्या कारने सुरजच्या दुचाकीला जोराची धडक दिली.त्यात त्याचा मृत्यू झाला . सुरजचे शिक्षण बीएससी केमिस्ट्री झाल्याने तो गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका फौंड्रीत काम करत होता. सुरजला एक मोठा भाऊ असुन तो मेकॅनिक इंजिनियर असून तो मागील आठवड्यात इंदोरला नोकरीसाठी गेला आहे.

 

सुरजचे वडील हे डॉक्टर होते त्यांचे महिन्यापूर्वी निधन झाले आहे. सुरजच्या कुटुंबात आई , मोठा भाऊ व सुरज असे तिघे राहत होते. तरूण मुलाच्या अपघाती मृत्यूच्या माहितीने आईला मानसिक धक्का बसला आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -