Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रगोकुळ अध्यक्ष नविद मुश्रीफ मुख्‍यमंत्र्यांना भेटीला, 'या' प्रश्‍नांबाबत होणार चर्चा

गोकुळ अध्यक्ष नविद मुश्रीफ मुख्‍यमंत्र्यांना भेटीला, ‘या’ प्रश्‍नांबाबत होणार चर्चा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष नविद मुश्रीफ आज (ता.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यावर अध्यक्ष मुश्रीफ यांना भेट मिळाली नव्हती.

 

तेव्हाच पुढील आठवड्यात भेट देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार अध्यक्ष मुश्रीफ मुंबईला रवाना झाले आहेत.

 

‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे, असा आग्रह माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंकडे होता. त्यानुसार अध्यक्षपदावेळी वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. यातून निश्‍चित समजल्या जाणाऱ्या दोघा संचालकांना अध्यक्षपदापासून बाजूला राहावे लागले. यानंतर अध्यक्षांसह संचालक मुंबईला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली नव्हती. ही भेट पुढील आठवड्यात घेऊ, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार उद्या दुपारी बाराच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर अध्यक्ष मुश्रीफ यांना वेळ दिली आहे. दुपारी त्यांची भेट झाल्यानंतर येथे वाशी येथील मदर डेअरीची जागा मिळण्यासह अन्य प्रश्‍नांबाबतही मुश्रीफ हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -