Wednesday, June 25, 2025
Homeकोल्हापूरkolhapur : शहरातील 36 ठिकाणे, जिल्ह्यातील 43 गावे हायरिस्कवर

kolhapur : शहरातील 36 ठिकाणे, जिल्ह्यातील 43 गावे हायरिस्कवर

जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यूसह आता चिकुनगुनियाचा डंख तीव्र होत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांत (1 जानेवारी 2025 ते 5 जून 2025) जिल्ह्यात 68 जणांना डेंग्यू तर 46 जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे शहरातील 36 ठिकाणे डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरियासाठी हायरिस्क झोनमध्ये आहेत. तर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 43 गावे हायरिस्कमध्ये आहेत. येणार्‍या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानतंर कीटकजन्य आजारांचा विळखा आणखी घट्ट होण्याचा धोका आहे. यामुळे डेंग्यूचा डंख रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

गत वर्षीच्या तुलनेत यंदा देशभरात डेंग्यूसह चिकुनगुनियाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तीन महिन्यांत देशभरात 12 हजार 43 जणांना डेंग्यू तर 1 हजार 741 जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात 1 हजार 159 जणांना डेंग्यू तर 592 जणांना चिकुनगुनिया झाला आहे. कोल्हापुरातही गेल्या सहा महिन्यात कीटकजन्य आजारांत वाढ होत असून येणार्‍या पावसाळ्यात रुग्णसंख्येत मोठा स्पाईक दिसण्याची शक्यता आहे.

 

डेंग्यूचा प्रसार एडीस इजिप्ती जातीच्या डासामुळे होतो. जो प्रामुख्याने दिवसा चावतो आणि स्थिर, स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. यामुळे डेंग्यूपासून बचावासाठी पावसाळ्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी परिसर स्वच्छ ठेवा, टायर, बाटल्या, नारळाच्या साली, फुलदाण्या, बादल्या यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, अंगावर लाल चट्टे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे यांनी सांगितले की, डेंग्यू व चिकुनगुनियासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील हायरिस्क ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून या झोनमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत.

 

शहरातील हायरिस्क ठिकाणे

 

कसबा बावडा, लाईन बझार, टेंबलाई वाडी, मोरे मानेनगर, कनाननगर, वाल्मिकीनगर, दुधाळी परिसर, सुभाषनगर, यादवनगर, जवाहरनगर, बालाजी पार्क, रामानंदनगर, वारे वसाहत, राजेंद्रनगर, जोशीनगर, झोपडपट्टी, शिवाजी पेठ, सदर बझार, विचारे माळ, विक्रमनगर, भोसलेवाडी, कदमवाडी, सिद्धार्थनगर, सी.पी.आर. आवार, शुक्रवार पेठ, अकबर मोहल्ला, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, सम्राटनगर, बुधवार पेठ, रमणमळा परिसर, साळोखेनगर, दौलतनगर, बापट कॅम्प परिसर, पांजरपोळ परिसर, वर्षानगर, उत्तरेश्वर पेठ

 

ग्रामीण भागातील हायरिस्क गावे

 

शिरोळ : शिरदवाड, शिरोळ, चिंचवाड, दानोळी, यड्राव, जयसिंगपूर. हातकणंगले : किणी, भादोले, टोप, नागाव, चोकाक, आळते, हातकणंगले, पट्टण कोडोली, रुई. करवीर : कणेरी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, वळिवडे, मुडशिंगी, सांगवडेवाडी, सांगरुळ, वडणगे, उचगाव, नेर्ली. पन्हाळा : कोडोली, काळजवडे, वाघवे. शाहूवाडी : शित्तूर, शित्तूर वारुण.

 

कागल : कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, पिंपळगाव, हमीदवाडा, बोळावी. राधानगरी : कसबा तारळे, बारडवाडी, सोळांकूर. भुदरगड : लोटवाडी, मुधाळ, पिंपळगाव. आजरा : वाटंगी. गडहिंग्लज : हलकर्णी. चंदगड : मांडवाडी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -