Thursday, January 15, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी : शिवाजीनगरच्या पोलिस निरिक्षकपदी दिलीप पवार

इचलकरंजी : शिवाजीनगरच्या पोलिस निरिक्षकपदी दिलीप पवार

येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक दिलीप पवार रुजू झाले आहेत. पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांची महिनाभरापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली झाली होती. या रिक्त पदावर दिलीप पवार यांची नियुक्ती झाली आहे.

 

पवार हे पोलिस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी मुंबई, ठाणे, सोलापूर, धाराशिव, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर या ठिकाणी सेवा बजावली आहे. काही दिवसांपूर्वी गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट प्राविण्य दाखवल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून त्यांना सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -