पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. (fake)‘RTO Traffic Challan.apk’ नावाचं एक बनावट अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यामुळे अनेक नागरिकांची बँक खात्यातील रक्कम लंपास करण्यात आली आहे. या अॅपमुळे नागरिकांचे मोबाईल हॅक होऊन वैयक्तिक माहिती, बँक तपशील, OTP आणि ई-मेल अकाऊंट्सवर सायबर गुन्हेगारांनी ताबा मिळवला. या प्रकारामुळे सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मिडिया आणि व्हॉट्सॲपवरून ‘RTO Traffic Challan.apk’ नावाच्या फाईलचा प्रसार केला जात आहे. नागरिक ती फाईल चूकून इन्स्टॉल करतात आणि एकदा मोबाईलमध्ये हे अॅप गेलं की, संपूर्ण फोनवर हॅकर्सचा ताबा मिळतो. यानंतर मोबाईलमधून बँक खात्याची माहिती चोरून रक्कम ट्रान्सफर केली जाते.(fake)सायबर पोलिस निरीक्षक रवीकिरण नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्स ई-सिमसाठी विनंती करून बँक खात्याशी लिंक असलेले मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी बदलतात. त्यामुळे बँक OTP आणि महत्त्वाची अधिसूचना थेट हॅकर्सकडे पोहोचते. OTP आल्यावर ते बँकिंग व्यवहारांवर नियंत्रण मिळवून इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे चोरतात.
या प्रकारात सध्या १५ पेक्षा अधिक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही थर्ड पार्टी APK किंवा संशयास्पद अॅप्स डाऊनलोड करू नयेत, असं सायबर पोलिसांचं स्पष्ट आवाहन आहे. mahatrafficechallan.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ वापरावं, असा सल्ला देण्यात आला आहे.पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “डिजिटल व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. एखादा अॅप मोबाईलमध्ये घेतल्याने तुमचं पूर्ण आर्थिक व्यवहाराचं नियंत्रण कुण्या हॅकरकडे जाऊ शकतं. त्यामुळे सावध राहा.”
पोलिसांकडून दिलेल्या सूचना:
– कोणतीही APK फाईल/अधिकृत नसलेले अॅप्स डाऊनलोड करू नका
– वाहतूक चलन पाहण्यासाठी केवळ अधिकृत वेबसाईटच वापरा
– WhatsApp Two-Step Verification चालू ठेवा
– कोणतीही संशयास्पद लिंक उघडण्याआधी खात्री करा
– फसवणूक झाल्यास www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा
– सायबर हेल्पलाइन 1930 वर तात्काळ संपर्क साधा
पुण्यात नवा सायबर फसवणुकीचा धोका; नागरिकांनी घ्यावी काळजी “
सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक कुशल आणि धोकादायक बनत आहेत. ‘RTO’च्या नावाखाली झालेल्या (fake)या फसवणुकीमुळे नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. अनधिकृत अॅप्स, सॉफ्टवेअर आणि थर्ड पार्टी फाईल्सपासून दूर राहणं, ही काळाची गरज बनली आहे.