Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रसुरक्षित समजल्या जाणाऱ्या राखीव दल वसाहतीत धाडसी घरफोडी; २.२५ लाखांचा ऐवज लंपास

सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राखीव दल वसाहतीत धाडसी घरफोडी; २.२५ लाखांचा ऐवज लंपास

शहरातील राज्य राखीव दल वसाहतीमध्ये घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोट्यांनी दोन घरे फोडून सुमारे २.२५ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे.

 

ठसे तज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळविले आहेत. त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

शहरातील खटकाळी रोड भागात राज्य राखीव दलाची वसाहत आहे. या ठिकाणी राखीव दलाच्या अधिकाऱ्यांची कार्यालयाचे आहेत. या शिवाय अधिकारी व जवानांची निवासस्थाने आहेत. राखीव दल वसाहतीमध्ये कोणालाही परवानगी शिवाय प्रवेश नसल्यामुळे ही वसाहत सर्वात सुरक्षीत वसाहत मानली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -