जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. रक्षा बंधनासह 15 ऑगस्ट आणि पुढे सणांची गर्दी होणार आहे. त्याअगोदरच या बहुमूल्य धातुंनी दरवाढीची वर्दी दिली आहे.
सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 600 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरवाढीने ग्राहकांना धक्का बसला.
सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 2 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 15 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
आठवडाभरापासून चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण दिसली. गेल्या शनिवारी एक किलो चांदीचा दर 1,16,000 होते. त्यानंतर त्यात घसरण दिसली
रक्षा बंधनाला खरेदी करता यावी यासाठी ग्राहक सराफा बाजाराकडे वळले होते. पण दरवाढीने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.
अमेरिकेने जे टेरीफ ते लागू केले आहे, त्याचा सोन्या आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम ज्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेने जे टेरीफ ते लागू केले आहे, त्याचा सोन्या आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम ज्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.