Thursday, August 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर हादरलं! पती पत्नीमध्ये मध्यरात्री वाद, संतापलेल्या पतीने केला पत्नीचा निर्घृणपणे खून;...

कोल्हापूर हादरलं! पती पत्नीमध्ये मध्यरात्री वाद, संतापलेल्या पतीने केला पत्नीचा निर्घृणपणे खून; आधी गळा दाबला नंतर

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घरात झालेल्या वादानंतर पत्नीचा निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून हत्येची माहिती दिली.

 

या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव परशुराम पांडुरंग पाटील (वय 44) असे असून, तो एका फौंड्रीत काम करतो. पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने गळा कापून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली. हत्याकेल्यानंतर ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक कर्ली आहे. ही ५ ऑगस्टच्या मध्यरात्री महालक्ष्मीनगर, आपटेनगर परिसरात घडली.

 

नेमकं काय घडलं?

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम पाटील हा मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील असून,सध्या महालक्ष्मीनगर येथे आपल्या पत्नी अस्मिता (वय 44), दोन मुले आणि वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होते. आरोपी परशुराम पाटील उद्यमनगरमधील फौंड्रीत काम करत होता. त्यांची मुले बाहेर होती आणि वडील दुसर्या खोलीत झोपले होते. तेव्हाच परशुराम आणि अस्मिता यांच्यात पैश्यांच्या कारणावरून वाद झाला. त्याच वादाच्या रागात परशुरामाने त्याच्या पत्नीचा गळा दाबून बेशुद्ध केलं, त्यानंतर घरातल्या चाकूने गळा कापून तिचा खून केला. नांतर त्यांनी स्वतःहून पोलिसांना फोन करून घटनेची कबुली दिली.

 

वाद का झाला?

 

परशुरामने सांगितले, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः चं घर विकलं होते. त्यातून मिळालेली रक्कम, इतरांकडून घेतलेले हातउसने पैसे आणि मुलांच्या नावावर फायनान्स कंपनीतून घेतलेलं प्रत्येकी एक लाख रुपयांचं कर्ज याची स्पष्ट माहिती अस्मिता देत नव्हती. याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. मंगळवारी रात्री अशाच एका वादात ही दुर्दैवी घटना घडली.

 

या घटनेनंतर पाटील दाम्पत्याची दोन मुलांची लं मानसिकदृष्ट्या हादरली आहेत.आईचा म्र्यु आणि वडील तुरुंगात या धक्क्याने कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने मुलांनी बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कार केले. तर करवीर पोलिसांनी परशराम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे महालक्ष्मीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

काय माहिती दिली पोलिसांनी

 

करवीर पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पाटील मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील रहिवासी आहे. पत्नी, दोन मुले, वडिलांसह तो महालक्ष्मीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो. तो उद्यमनगरात फौंड्रीत काम करतो. मोठा मुलगा खासगी नोकरी करतो, तर लहान मुलगा शिकत आहे. घरामध्ये सुरू असलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना पाच वर्षापूर्वी स्वतःच्या मालकीचं घर विकावं लागलं. हे कुटुंब महालक्ष्मीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला आलं, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाटील दाम्पत्यामध्ये पैशांवरून वाद झाला. त्यावेळी दोन्ही मुले बाहेर गेली होती, तर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. रागाच्या भरात पाटीलने पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पत्नीचा घरातील चाकूने गळा कापला. पत्नीचा खून केल्यानंतर मोबाइलवरून 112 नंबरवर पोलिसांना फोन केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -